बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 12:15 PM2023-06-04T12:15:05+5:302023-06-04T12:16:22+5:30

जबाबदार लोक कोण आहेत याची निश्चिती केली गेली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याची चौकशी केली आहे. लवकरच याचा अहवाल समोर येईल. - अश्विनी वैष्णव

Cause of Balasore train accident understood; Railway Minister Ashwini Vaishnaw claim that the accident was not caused by 'Kavach' | बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

googlenewsNext

बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचे कारण आता समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या ट्रेनना कवच प्रणाली असती तर अपघात वाचले असते असे व्यक्तव्य केले होते. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अपघाताचे कारण कवच प्रणाली नसल्याचे सांगितले आहे. 

ममता यांनी त्यांना जी माहिती होती त्यानुसार त्या बोलल्या आहेत. परंतू कवच प्रणाली नसणे हे अपघाताचे कारण नाहीय. तर हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याने घडला आहे. ममता यांनी हा अपघात कोणत्या दुसऱ्या गोष्टीमुळे झालाय असे म्हटलेले नाही. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे रेल्वेमंत्री म्हणाले. 

जबाबदार लोक कोण आहेत याची निश्चिती केली गेली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याची चौकशी केली आहे. लवकरच याचा अहवाल समोर येईल. मोदींनी काल निर्देश दिले होते. एका ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. आता इलेक्ट्रीसिटी नीट करण्याचे काम सुरु आहे. आज रेल्वे ट्रॅक सुरु करण्याचे प्रयत्न आहेत, असे वैष्णव म्हणाले. 

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या तपासासंदर्भात वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 
 

Web Title: Cause of Balasore train accident understood; Railway Minister Ashwini Vaishnaw claim that the accident was not caused by 'Kavach'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.