उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 09:21 AM2022-08-19T09:21:50+5:302022-08-19T09:30:49+5:30
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचं समर्थनच केलं होतं. त्यानंतर, 4 दिवसांतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे.
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे. गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर, आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची रेड पडली आहे. सिसोदिय यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागत केलं आहे.
ये लोग दिल्ली की शिक्षा और स्वास्थ्य के शानदार काम से परेशान हैं. इसीलिए दिल्ली के स्वास्थ्य मंत्री और शिक्षा मंत्री को पकड़ा है ताकि शिक्षा स्वास्थ्य के अच्छे काम रोके जा सकें.
— Manish Sisodia (@msisodia) August 19, 2022
हम दोनों के ऊपर झूँठे आरोप हैं. कोर्ट में सच सामने आ जाएगा.
सीबीआय आली आहे, तीचं स्वागत करतो. आम्ही कट्टर इमानदार आहोत, लाखो मुलाचं भविष्य बनवत आहोत. आपल्या देशात जे चांगलं काम करत आहेत, त्यांना त्रास दिला जातो, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणूनच आपला देश आत्तापर्यंत 1 नंबर होऊ शकला नाही, असे ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे. सत्य लवकर बाहेर येण्यासाठी आम्ही सीबीआयला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या. पण, त्यातून काहीही समोर आले नाही. यातूनही काही पुढे येणार नाही. देशातील चांगल्या शिक्षणासाठीचे माझे काम थांबू शकत नाही, असे ही सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
जिस दिन अमेरिका के सबसे बड़े अख़बार NYT के फ़्रंट पेज पर दिल्ली शिक्षा मॉडल की तारीफ़ और मनीष सिसोदिया की तस्वीर छपी, उसी दिन मनीष के घर केंद्र ने CBI भेजी
CBI का स्वागत है। पूरा cooperate करेंगे। पहले भी कई जाँच/रेड हुईं। कुछ नहीं निकला। अब भी कुछ नहीं निकलेगा https://t.co/oQXitimbYZ— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 19, 2022
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीबीआयचे स्वागत करत असल्याचे म्हटले. तसेच, आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, यापूर्वीही काही मिळाले नाही, आताही काही सापडणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.