नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचं समर्थनच केलं होतं. त्यानंतर, 4 दिवसांतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे.
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे. गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर, आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची रेड पडली आहे. सिसोदिय यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागत केलं आहे.