डायबेटीस, ब्लडप्रेशरसह एकूण ७४ महत्वाच्या औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित, जाणून घ्या नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 01:37 PM2023-02-28T13:37:37+5:302023-02-28T13:38:28+5:30

केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींसह एकूण ७४ औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत.

Centre fixes retail prices of diabetes high blood pressure 74 other medicines Check latest rates | डायबेटीस, ब्लडप्रेशरसह एकूण ७४ महत्वाच्या औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित, जाणून घ्या नवे दर...

डायबेटीस, ब्लडप्रेशरसह एकूण ७४ महत्वाच्या औषधांच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित, जाणून घ्या नवे दर...

googlenewsNext

नवी दिल्ली-

केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादींसह एकूण ७४ औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. NPPA ने २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या १०९ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या आधारे ड्रग्ज (किंमत नियंत्रण) आदेश २०१३ अंतर्गत औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत.  

NPPA च्या अधिसूचनेनुसार, Dapagliflozin Sitagliptin आणि Metformin Hydrochloride (Extended-Release Tablet) च्या एका टॅब्लेटची किंमत २७.७५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, औषध नियामक संस्थेने टेल्मिसर्टन (उच्च रक्तदाब, हृदयक्रिया बंद पडणे आणि मधुमेही मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे) आणि बिसोप्रोल फ्युमरेट (हृदयविकारासाठी वापरले जाणारे) यांसारख्या रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीही कमी केल्या आहेत. एका टॅब्लेटची किंमत १०.९२ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

NPPA ने ८० अधिसूचित औषधांच्या (NLEM 2022) कमाल मर्यादेच्या किमती देखील सुधारित केल्या आहेत, ज्यामध्ये एपिलेप्सी आणि न्यूट्रोपेनियाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे. याशिवाय, NPPA ने सोडियम व्हॅलप्रोएट (20mg) च्या किमती देखील कमी केल्या आहेत. एका टॅब्लेटची किंमत ३.२० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसंच फिलग्रास्टिम इंजेक्शनची (एक कुपी) किंमत १,०३४.५१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. हायड्रोकॉर्टिसोन हे एक स्टेरॉईड आहे याची किंमत प्रति टॅब्लेट १३.२८ रुपये इतकी करण्यात आली आहे.

NPPA ला नियंत्रित बल्क औषधांच्या आणि फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करणे/सुधारणा करणे आणि देशातील औषधांच्या किमती आणि उपलब्धता लागू करणे बंधनकारक आहे. औषधांच्या किमती वाजवी मागणीच्या काळातही नियंत्रित राहतील यावर लक्ष ठेवण्याचं कामही एनपीपीए करत असतं. औषध (किंमत नियंत्रण) आदेशाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचं काम यामार्फत गेलं जातं. ग्राहकांकडून औषधांसाठी उत्पादकांकडून जादा पैसे आकारले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचं काम एनपीपीए करतं.

Web Title: Centre fixes retail prices of diabetes high blood pressure 74 other medicines Check latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.