चांद्रयान-२ ने पाठवलेल्या 'त्या' फोटोत दिसले जॅक्सन, कोरोलेव्ह अन् मित्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:26 PM2019-08-26T20:26:25+5:302019-08-26T20:35:12+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 लवकरच चंद्रावर उतरणार आहे.
नवी दिल्लीः भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 लवकरच चंद्रावर उतरणार आहे. तत्पूर्वीच चंद्राच्या पृष्ठभागावरील काही छायाचित्रं इस्रोनं प्रसिद्ध केली आहेत. चंद्रावरची ही छायाचित्रं इस्रोच्या चांद्रयान 2 (Chandrayaan 2) यानातील Terrain Mapping Camera-2 (TMC-2)ने टिपली आहेत. इस्रोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या छायाचित्रांवरून चंद्रावरील खड्डे (Impact Crater) आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांना जॅक्सन, माच, कोरोलेव्ह आणि मित्रा अशा नावानं संबोधण्यात आलं आहे. क्रेटर्सला मित्रा हे नाव(प्रा. सिसिर कुमार मित्रा) यांच्या नावावरून देण्यात आले आहे. 23 ऑगस्टला चंद्रापासून 4375 किलोमीटर अंतरावरून ही छायाचित्रे टिपण्यात आली असून, इस्रोने ट्विट करत ही छायाचित्रं व्हायरल केली आहेत.
तत्पूर्वी चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2650 किलोमीटर अंतरावरून काही फोटो टिपण्यात आले होते. चांद्रयान - २मधील विक्रम रोव्हर लँडरने 21 ऑगस्ट रोजी काही फोटो टिपले होते. टिपलेल्या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत. अनेक ग्रह आणि उपग्रहांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना Impact Crater असे म्हटले जाते. जॅक्सन हा चंद्राच्या उत्तरेकडच्या गोलार्धात पाहायला मिळाला. तर कोरोलेव्ह हा चंद्राच्या उत्तरेकडील अक्षांशात पडलेला एक खड्डा आहे. सध्या उपलब्ध असलेल्या या क्रेटर्स(खड्ड्यां)पैकी काही क्रेटर्स हे 50 हजार वर्षे जुने आहेत.
Meet Prof. Sisir Kumar Mitra after whom the Mitra crater is named
— Vinay Verma (@Vinay___Verma) August 26, 2019
Feeling Proud!!
Jai Hind 🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/EJwZ26V1M7
चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान-2 ने महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे, असी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज सांगितले.
#ISRO
— ISRO (@isro) August 26, 2019
Lunar surface imaged by Terrain Mapping Camera-2(TMC-2) of #Chandrayaan2 on August 23 at an altitude of about 4375 km showing craters such as Jackson, Mach, Korolev and Mitra (In the name of Prof. Sisir Kumar Mitra)
For more images please visit https://t.co/ElNS4qIBvhpic.twitter.com/T31bFh102v
चांद्रयान -2 यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आतापर्यंतच्या मोहिमेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मोहिमेतील पुढील टप्प्यांविषयी माहिती दिली. ''या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत.'', असे सिवान यांनी सांगितले.