गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात धीरेंद्र शास्त्री यांची चर्चा रंगली आहे. हेच महाराज बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना बागेश्वर महाराज म्हणून देखील ओळखले जाते. खरंतर, गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात याच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्याच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप घेतला गेला. दरम्यान, जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत मोठं वक्यव्य केलं आहे.
“आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे चमत्कार दाखवतात आणि जनतेला ठगतात. आम्ही त्या सर्व लोकांना सांगितलंय जे चमत्कार करतात, त्यांनी पुढे यावं आणि जोशीमठातील भूस्खलन थांबवून दाखवावं,” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. त्यांनी धर्म, चमत्कार आणि राजकारणाच्या मुद्द्यावर आजकशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. “मला बागेश्वर धाम माहित नाही. काही लोकांनी त्या ठिकाणी चमत्कार होत असल्याचं सांगितलं. जर असं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि जोशीमठातील भूस्खलन थांबवावं,” असंही त्यांनी नमूद केलं. आमच्या लोकांनी ते आम्हाला भेटण्यास येणार असल्याचं सांगितलं. जर ते आमच्याकडे आले आणि चमत्काराची गोष्ट स्वीकारली तर आम्ही त्यांना कोणती साधना केली हे विचारू. कोणत्या शास्त्र आणि परंपरेनुसार त्यांनी साधना केली, कोणत्या सिद्धी मिळल्या, ज्या आधारावर ते चमत्काराची गोष्ट करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जोशीमठ समस्येवरून लक्ष वळवलं“जोशीमठाचं प्रकरण अतिशय मोठं झालं आहे. सर्वांचं लक्ष त्याच ठिकाणी होतं. अशात लक्ष वळवण्यासाठी हे केलं गेलंय. जेव्हा आपल्याकडे कोणती मोठी समस्या येते तेव्हा लक्ष वळवण्यासाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टी मोठ्या असल्याचं सांगून दाखवल्या जातात. आता सर्व लोक जोशीमठाची ससम्या विसरले आहे, पण ती मोठी समस्या आहे. सर्वांचं लक्ष आता याकडे वळलंय. यानं देशाला कोणता लाभ होतोय?” असा सवालही शकराचार्य यांनी केला.
प्रत्येक ठिकाणी राजकारणया चमत्कारातही राजकारण आहे का? असा सवाल शंकराचार्य यांना करण्यात आला. “आता राजकारण कुठे नाही, प्रत्येक ठिकाणी राजकारण होतंय,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.