मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

By महेश गलांडे | Published: December 8, 2020 11:42 AM2020-12-08T11:42:10+5:302020-12-08T11:44:58+5:30

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

Chief Minister Arvind Kejriwal imprisoned at home, your serious allegations against Delhi Police | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

Next
ठळक मुद्देहरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज (मंगळवारी) या आंदोलनाचा 12 वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करत, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी सकाळी सिंघु सीमेवर दाखल झाले होते. त्यामुळे, आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच नरजकैद केलं आहे.

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातच स्थानबद्द केलं आहे. त्यांच्या घरी कोणालाही जाऊ दिलं जात नाही, तसेच त्यांनाही घरातून बाहेर पडू दिलं जात नाही. केजरीवाल यांच्यासमवेत ज्या आमदारांनी सोमवारी बैठक घेतली, त्या आमदारांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कार्यकर्तेच केजरीवाल यांच्या घराबाहेर नजर ठेऊन बसल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय. 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने भाजपाने दिल्लीत तिन्ही महापालिकांच्या महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलनास बसवले आहे. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांना तैनात करण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावले आहेत. एकप्रकारे केजरीवाल यांना घरातच स्थानबद्ध करण्याचं काम भाजपाने दिल्ली पोलिसांच्या मदतीने केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंटो अल्फोस यांनी आम आदमी पक्षाचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांवर केलेला आरोप बिनबुडाचा असून अरविंद केजरीवाल हे सोमवारी रात्रीही घराबाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते रात्री 10 वाजता घरी परतले आहेत, असेही अल्फोस यांनी सांगितले.  

Web Title: Chief Minister Arvind Kejriwal imprisoned at home, your serious allegations against Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.