पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 08:14 AM2024-03-10T08:14:11+5:302024-03-10T08:16:48+5:30
पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे, देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. या वर्षी रामनवमी १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसक घटनांसाठी भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जबाबदार धरले. तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या वर्षी रामनवमीच्या वेळीही हिंसाचार झाला होता.
पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल
पश्चिम बंगाल सरकारच्या या घोषणेवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “ममता बॅनर्जी प्रत्येक वेळी ‘जय श्री राम’ ऐकल्या की रागाने लाल व्हायच्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राम नवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपली हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हे केले आहे. मात्र, आता खूप उशीर झाला आहे. विशेष म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. जय श्री राम!, असं त्यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेस आज रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड ग्राउंडवर एक मोठी रॅली काढणार आहे. या रॅलीने TMC लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. या रॅलीला 'जन गर्जन सभा' असे नाव देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी या प्लॅटफॉर्मचा वापर आगामी निवडणुकांचा अजेंडा ठरवण्यासाठी करू शकतात. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही या रॅलीला संबोधित करू शकतात.रॅलीपूर्वी शनिवारी संध्याकाळी अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतः सभास्थळाची पाहणी केली. या रॅलीआधी राज्य सरकाने सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.