क्रूरतेचा कळस! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाने केली बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:23 PM2023-03-25T12:23:58+5:302023-03-25T12:37:33+5:30

शाळेच्या वसतिगृहात राहणारा आदित्यचा मित्र शिवम याने सांगितले की, बुधवारी शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे आदित्यला काठीने मारहाण केली होती.

child killed for not doing homework in bihars saharsa school director absconded | क्रूरतेचा कळस! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाने केली बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू

क्रूरतेचा कळस! गृहपाठ न केल्याने शाळेच्या संचालकाने केली बेदम मारहाण; विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext

बिहारमधील सहरसा येथे सात वर्षांच्या मुलाला शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मारहाण इतकी बेदम होती की यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घटनेपासून आरोपी फरार आहे. मात्र, ज्या हॉस्पिटलमध्ये मुलाचा मृत्यू झाला तेथील डॉक्टरांनी सांगितले की, मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. 

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल. हे प्रकरण जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर पोलीस ठाण्याच्या हुसेनचक भागातील आहे. बौधी पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. या शाळेतील आदित्य सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. शाळेच्या वसतिगृहात राहणारा आदित्यचा मित्र शिवम याने सांगितले की, बुधवारी शाळेच्या संचालकाने गृहपाठ न केल्यामुळे आदित्यला काठीने मारहाण केली होती. 

शिवमने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य संध्याकाळी जेवण करून झोपायला गेला होता. सकाळी ब्रश करायला मी त्याला उठवायला गेलो तेव्हा त्याचे शरीर ताठ झाले होते. आम्ही त्याला उचलून शाळेच्या संचालकांकडे नेले तेव्हा शाळेच्या संचालकांनी सांगितले की, त्याचा मृत्यू झाल्याचे दिसते. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यानंतर शाळेच्या संचालकांनी मुलाच्या वडिलांना फोन करून तुमचा मुलगा बेशुद्ध झाला असल्याचे सांगितले. 

रुग्णालयात नेले जात आहेत. तुम्ही रुग्णालयात मुलाला पाहायला या असं सांगितलं. वडील सहरसा येथील आशा नर्सिंग होममध्ये पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले होते. मुलाच्या मृत्यूनंतर शाळेचे संचालक सुजित कुमार फरार आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: child killed for not doing homework in bihars saharsa school director absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.