बालिकेवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार, कर्मचाºयाला अटक; मुलीवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:54 AM2017-10-06T04:54:54+5:302017-10-06T04:55:13+5:30

खासगी शाळेच्या स्वच्छतागृहात सहा वर्षांच्या मुलीवर बुधवारी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून सफाई कामगाराला अटक करण्यात आली.

Child sexual abuse, employee's arrest; Treatment for the girl | बालिकेवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार, कर्मचाºयाला अटक; मुलीवर उपचार सुरू

बालिकेवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार, कर्मचाºयाला अटक; मुलीवर उपचार सुरू

Next

नवी दिल्ली : खासगी शाळेच्या स्वच्छतागृहात सहा वर्षांच्या मुलीवर बुधवारी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून सफाई कामगाराला अटक करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी हा कामगार रुजू झाला होता. पहिल्या वर्गातील ही मुलगी स्वच्छतागृहात गेल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पालकांच्या तक्रारीनुसार, मुलगी घरी आली व तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालक शाळेत आले व त्यांनी मुख्याध्यापकांना घटना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावले. मुलीला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

छळामुळे मुलगी इमारतीतून पडली
फरिदाबाद : छळाला त्रासलेली १४ वर्षांची मुलगी बुधवारी पळून जाण्याच्या प्रयत्नांत ११व्या मजल्यावरून पडली व कबुतरांना रोखण्यासाठी बांधलेल्या जाळीत अडकल्यामुळे वाचली. या मुलीला मारहाण झाली असून, तिचे कुपोषणही झाले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. येथील सेक्टर ३७मधील कनिष्क टॉवरमधील रहिवाशांना ही मुलगी दहाव्या मजल्याच्या जाळीत अडकल्याचे दिसले. कबुतरांना रोखण्यासाठी ही जाळी बाल्कनीला बांधण्यात आलेली आहे. खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या पाटण्याच्या विद्यार्थ्याकडे ही मुलगी घरकामाला होती. त्याला ताब्यात घेतले आहे. पीडिता व विद्यार्थ्याचे कुटुंबीय हे पाटण्यात राहतात.

Web Title: Child sexual abuse, employee's arrest; Treatment for the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.