India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:59 PM2020-06-24T19:59:58+5:302020-06-24T20:08:54+5:30

दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहे. मात्र, असे असतानाही चीन एलएसीवर सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे....

china continues military build up along lac india shows its military strength | India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

Next
ठळक मुद्देफिंगर 8पर्यंत भारताचा दावा आहे. मात्र सध्याचा तणाव पाहता, चीन पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय जवानांना फिंगर 4वरच अडवत आहे.लष्कराने जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले, ते चीनने पुन्हा तयार केले चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारतही लद्दाखमध्ये आपली ताकद वाढवत आहे.

लेह :भारत आणि चीनदरम्यान 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे दोन्ही देशांच शांततेसाठी चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे एलएसीवर चीन सातत्याने आपली शक्ती वाढवत आहे आणि सैन्याची जमवाजमव करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंगाँग त्सो सरोवरासह फिंगर्स भागाच्या जवळपास चीनने आपले सैन्य वाढवले आहे. याशिवाय वादग्रस्त भागांत चीनचे बांधकामही सुरूच आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिंगर 8पर्यंत भारताचा दावा आहे. मात्र सध्याचा तणाव पाहता, चीन पेट्रोलिंग करणाऱ्या भारतीय जवानांना फिंगर 4वरच अडवत आहे. फिंगर्स भागात चीन आक्रामकपणे अनेक नव्या भागांवर नियंत्रण मिळवत आहे. सूत्रांनी सांगितले, की गलवान नदी भागातील हिंसक संघर्षानंतरही चीनने आपले अनेक स्ट्रक्चर्स उभे केले आहेत. 

लष्कराने जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले, ते चीनने पुन्हा तयार केले - 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी 15-16 जूनला पेट्रोलिंग पॉइंट 14च्या जवळील जे स्ट्रक्चर्स उखडून फेकले होते, ते चीनने पुन्हा तयार केले आहेत. याबरोबरच दौलत बेग ओल्डी सेक्टरच्या अगदी समोरच्या भागातही भारताच्या पेट्रोलिंग पॉइंट 10 ते 13 मध्येदेखील चिनी सैन्य अनेक अडथळे आणत आहे. 

फायटर जेट्सने दाखवली ताकद -
चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारतही लद्दाखमध्ये आपली ताकद सातत्याने वाढवत आहे. लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांनीही आज या भागाचा दौरा केला. याच बरोबर लडाखच्या आकाशात भारतीय हवाई दलाचे फायटर जेट्सदेखील दिसून आले. लेह येथील मिलट्री बेसवरून बुधवारी अनेक भारतीय जेट्सनी आकाशात झेप गेतली आणि 240 किलोमीटर दूरवर असलेल्या सीमा रेषेपर्यंत दौरा केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

 

...म्हणून भारताच्या मुत्सद्देगिरीपुढं झुकला चीन! 50 दिवसांच्या संघर्षानंतर 'मजबूर'

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

Web Title: china continues military build up along lac india shows its military strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.