स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 02:46 PM2021-10-02T14:46:20+5:302021-10-02T14:48:52+5:30

चीनच्या कुरापतींमुळे देशासमोर नवं संकट; बत्ती गुल होण्याची शक्यता

Chinas Practice India Snags Cheap Australian Coal Sitting At Chinese Ports | स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट

स्वत: अंधारात बुडाले, आता भारतालाही बुडवणार; चीनमुळे भारतावर मोठं संकट

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्येवीज संकट निर्माण झालं आहे. आता भारतातही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचशा वीज प्रकल्पांमधील उत्पादन बंद झालं आहे. तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. चीनच्या एका कृत्यामुळे भारत अडचणीत आला आहे.

भारत ऑस्ट्रेलियाहून कोळशाची आयात करतो. सध्या चीनच्या बंदरांवर भारताकडे येणारा २० लाख टनांहून अधिक कोळसा अनेक महिन्यांपासून पडून आहे. ऑस्ट्रेलियाहून कोळसा खरेदी केलेल्या व्यक्तींनी याबद्दलची माहिती दिली. चीनच्या बंदरांवर कोळसा पडून असल्यानं भारतामध्ये वीज संकट निर्माण होऊ शकतं.

ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला भारताला १२ ते १५ डॉलर प्रतिटन दरानं कोळसा विकतो. हा जगातील सर्वात स्वस्त कोळसा असून त्याचा दर्जादेखील चांगला आहे. भारतात सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या देशात कोळशाचं उत्पादन कमी असल्यानं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवतात. भारताला ऑस्ट्रेलियाकडून सवलतीच्या दरात कोळसा मिळतो.

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्याशिवाय भारत आणि चीनचे संबंधदेखील फारसे चांगले नाहीत. लडाखजवळच्या सीमावर्ती भागांत चीननं सैनिकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. चीन स्वत: वीज संकटाचा सामना करत आहे. हिवाळा सुरू असल्यानं या संकटाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यानंतरही चीननं ऑस्ट्रेलियाहून कोळसा मागवण्यात रस दाखवलेला नाही. भारतीय कंपन्यांनी ऑस्ट्रेलियाहून २० लाख टन औष्णिक कोळसा चीनच्या बंदरांमध्ये पडून आहे.

Web Title: Chinas Practice India Snags Cheap Australian Coal Sitting At Chinese Ports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.