चोडण पूल बातमी

By admin | Published: October 6, 2015 12:41 AM2015-10-06T00:41:56+5:302015-10-06T00:41:56+5:30

चोडण पूल बातमी

Chute Pool News | चोडण पूल बातमी

चोडण पूल बातमी

Next
डण पूल बातमी
तिसवाडी : चोडण बेटावरील महत्वाचा पुल गेल्या कित्येक वर्षापासून अनेक कारणामुळे रखडला गेला आहे. सरकारने देलेल्या आश्वासनाची पुर्तता व्हावी यासाठी स्थानिक रहिवाशांची चांगलीच कंबर कसली आहे. भाजप सरकाने दिलेले आश्वासन पाळले नसल्याने गेल्या एक वर्षापासून हा पुल चोडणच्या प्रत्येक ग्रामसभेत गाजत आहे.
भाजपाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता गेल्या तीन वर्षात न केल्याने चोडणचा पुल त्वरित बांधण्यासाठी सरकारने प्रयत्न करावायाठी गेल्या 9 नोव्हेबर 2014 रोजी चोडण युनायटेंड संघटनेची स्थापना करण्यात आली. व यावेळी चोडण येथे मोठी जनसभा घेऊन या पुलाची मागाणी धसास लावण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
चोडण हे गोव्यातील मोठय़ा आाकाराचे मोठे बेट स्वातंत्र्यापुर्वी चोडण -रायबंदर मार्गावर होडीने लोक प्रवास करीत होते. नतंर या मार्गावर फेरीबोट वाहतूक सुरू करण्यात आली. लोकांची रहदारी वाढली व एक एवजी दोन फेरीबोटी करण्यात आल्या नंतर 25 वर्षापूर्वी उत्तर- पुर्वेकडील भागात 50 ते 70 मीटर नदिवर पुल उभारून चोडण हे तिसवाडीतील बेट तिखाजन-मये म्हणजेच डिचोली तालूक्याला जोडले गेले. यामुळे चोडण-रायबंदर मार्गावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली गेली. त्यामुळे चोडण व या भागातून प्रवाशांतून पुलाची मागणी वाढू लागली.यात त्यावेळचे चोडण भागातील आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याकडे नदिपरिवहन खाते असल्याने त्यानी या मार्गावरील प्रवासी व दुचाकी वाहतूक मोफत करण्याची घोषणा केल्याने या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतून होऊ लागली. लोकांची व वाहनाची वाढलेली प्रचंड गर्दीमुळे तीसर्‍या व चौथ्या फेरीबोटीची आवश्यकता होऊ लागली सरकारकडे केलीली मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने लोकांनी जन अंदोलन करून दोन एवजी या मार्गावर चार फेरीबोटी आता वाहतूक करीत असतानाही यात नदिपरिवहन खात्याने योग्या नियोजन व सरकारचे दुर्लक्ष असल्याने याचा मोठा त्रास नेहमीच्या प्रवाशाना व स्थानिकाना होत असतो.
चोडण बेटावरील रहिवाशी गेल्या 50 वर्षापासून सरकारडे करीत आहे. या मागणीची गंभीरता पाहुन त्यावेळचे बांधकाममंत्री स्व. विल्फेड डिसौझा यानी या बेटावर पुल व्हावा यासाठी सोपस्कर पुर्ण केले होते व 1986 मध्ये याची पायाभरणीचा प्रस्तावही होता.याच काळात मांडवी नदिवरील नेहरू पुल कोसळल्याने हा प्रस्ताव बारगळला. नतंर या भागातील माजी आमदार कृष्णा कु?ीकर यानी इडीसीचे चेअरमॅन असताना कनडा बेज ली असोसिऐट कॅपनीला 5 जागेवर भू-सव्र्हेक्षण करण्यासाठी कत्राट दिले. यात दोन जागे निच्छित केले परंतू स्थानिक राजकत्यानी या पुलाचा मार्गाचे राजकारण केल्याने आमदार कु?ीकर यानी प्रामाणिक पणे केलेल्या प्रयत्नाला खो घातली. 10 वर्षे या मार्गाचा प्र्श्न चिघळला, शेवटी दि. 9 आग्स्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरकारला व तात्रीक दृष्टया चांगल्या मार्गाला प्राध्यान द्यावे असा ठराव घेऊन सरकराला पाठविवल्याने हा प्र्श्न सुटला.
नंतर या भागातून अनेक आमदार व मंत्री झाले. या पुलाला चालना देण्यास त्याना शक्य झाले नाही. नतंर कॉग्र्रेसच्या माजी- सचिव मार्गारेट आल्वा यांनीही पांडुरंग मडकईकर यांनी निवडून द्या व सहा महिन्यात पुल देऊ अशी घोषणा चोडणच्या जाहिर सभेत दिली होती. व याची पुर्तता केली नाही लोकांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा इतिहास आहे.
चोडणच्या लोकांना पुलाचे आश्वासन दिल्याने मोठय़ा प्रमाणात मते पदरात पडतात या धर्तीवर गेल्या निवडणूकीत भाजपच्या जाहिनाम्यात भाजपचा ऊमेदवार निवडून दिल्यास व सरकार स्थापन झाल्यास चोडण बेटावर सहा महिन्यात पुलाची पाया भरणी व दोन वर्षात पुलाचे बांधकाम करू असे सांगितले होते.
एवढेच नव्हेतर या पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनीतर निवडणूकीपुर्वी व नंतर चोडण वासियाना हा पुल त्वरित बाधू असे जाहिर सभेत आश्वासने दिली होती.
गेल्या तीन वर्षात या नियोजित पुलाविषयी कोणतीही हालचाल होत नसल्याने चोडण वासियानी चोडण युनायटेंड संघ स्थापन करून सरकारला व स्थानिक आमदारांनी जाब विचारण्याचा संकत्प बाधला आहे.
चोडण युनाटेंड संघटनेतर्फे केलेल्या कार्याचा आढावा घेत आहे.
1) नोव्हेबर, 2014 रोजी चोडण युनायडेंड संघटनेची स्थापना.
2) चोडण युनायडेंड संघटनेतर्फे दि. 9 नोव्हेबर रोजी आयोजित केलेल्या सभेला लोकांचा मोठाच प्रतिसाद, यावेळी मये भागातील लोकांचीही मोठी उपस्थिती. चोडण बेटावरील नियोजित पुलाला त्वरित पाठपुरावा करण्यासाठी लोकांचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
3) दि. 9 नोव्हेबर, 2014 रोजी चोडणच्या ग्रामसभेत भाजप सरकारने पुलाच्या आश्वासनाची पुर्तता न केल्याने पंचायतीकडे एका महिन्याच्या आत खास ग्रामसभा घ्यावी व पुलाच्या बांधकामाविषयी माहिती द्यावी यासाठी या ग्रामसभेत स्थानिक आमदार अनंत शेट, मुख्यमंत्री व जीआयएस्डीचे अधिकारी बोलवून पुलाची सविस्तर माहिती लोकांना द्यावी असा ठराव एकमताने घेण्यात आला.
3) या खास ग्रामसभेची पुर्तता एक महिन्याच्या एवजी तीन महिन्यातही पंचायतीने न केल्याने 7 फेब्रुवारी, 2015 मध्ये संघटनेतर्फे या ग्रामसभेविषयीची माहिती हक्कव्दारे मागणी.
4) दि. 11, फेब्रुवारी, 2015 रोजी चोडण पंचायतीने पणजी येथील साधन सुविधा महामंडळाला पत्र करून विचारपुस केली.
5) दि. 12 फेब्रुवारी रोजी म्हणजेच दुसर्‍याच दिवशी साधन सुविधा महामंडळाच्या अधिकार्‍याकडून नियोजित पुलासाठी जमिन संपादन प्रक्रिया चालू असल्याची माहीती पंचायतीला देण्यात आली.
5) पंचायतीने गेल्या तीन महिन्यात खास ग्रामसभा न घेतल्याने दि. 16, फेब्रुवारी, 2015 रोजी चोडण युनायडेंड संघटनेची बैठक व यात पंचायतीने खास ग्रामसभा न घेतल्याने तीव्र पडसाद. व मुख्यमंत्री व स्थानिक आमदाराना देण्याचा निर्णय घेतला.
6) दि. 18 फेब्रुवारी, 2015 रोजी मुख्यमंत्र्याचे सचिव व आमदार अनंत शेट यांना पुलाचे निवेदन व बोलणी करण्यासाठी तारीख देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या सचिवाना व स्थानिक आमदार अनंत शेट यांना लेखी पत्र देण्यात आले.
7) मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निवेदन देण्यासाठी चोडण संघटनेच्या पदाधिकार्‍यांना आमंत्रण देण्यात आले. यानूसार दि. 7 एप्रिल, 2015 रोजी सचिवालयात मुख्यमंत्र्याची भेट घेऊन निवेदन दिले. यात त्यानी चोडणचा पुल गेल्या कित्येक वर्षे करीत असून या पुलाला आपल्या प्राद्यान दिले जाईल असे आश्वास दिले. पंधरा दिवसात यावर चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार व साधन सुविधा महामंडळाच्या अधिकार्‍याकडे बैठक घेऊ असे मुख्यमंत्र्यानी आश्वासन संघटनेच्या पदाधिकार्‍याना दिले.
8 ) मुख्यमंत्र्यानी दिलेल्या आश्वानसानूसार पंधरा दिवसानी दि. 24 एप्रिल, 2015 रोजी पर्वरी येथील सचिवालय सभागृहात बैठक घेतली यात मुख्यमंत्री पार्सेकर, आमदार अनंत शेट, रोहन खंवटे, साधन सुविधा मंहामंडळाचे सरव्यवस्थापक सजिंत रोड्रीगीज, अभियंते, चोडण सरपंच सौ.आरती बांदोडकर,पंच, चोडण संघटनेचे चार पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुलाच्या जोड रस्त्याविषयी चर्चा करण्यात आली. ही जमिन संपादन प्रक्रिया कायदेशीर रित्या कशी संपादन करता येईल या विषयी जिल्हा- अधिकार्‍यांकडे 15 दिवसाच्या आत आमदारासह बैठक घेऊन या विषयी संघटनेला व चोडण पंचायतीला कळवू असे आश्वासन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिले होते
8) मुख्यमंत्री पार्सेकर यांनी 15दिवसात या बैठकीविषयी कळवू असे सांगितले असलेतरी संघटनेच्या वतीने ही बैठक मुख्यमंत्र्यानी न घेतल्याने व या विषयी सघटनेला काहीच कळविले नसल्याने दि. 7 सप्टेंबर, 2015 रोजी मुख्यमंत्री पार्सेकर व स्थानिक आमदार अनंत शेट यांना संघटनेने पत्र लिहून 15 दिवसाच्या आत जिल्हा-अधिकार्‍यांकडे बैठक घेणार या विषयी काय झाले यांची माहिती देण्याची विनंती केली आहे. अजूनपर्यंत यांची माहिती मुख्यमंत्री व आमदाराने न दिल्याने चोडण संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

6) दि. 5 मार्च, 2015 रोजी साधन सुविधा मंहामंडळाने दिलेल्या जमिन प्रक्रियेविषयीची लेखी माहीती देण्यात आली.
7) दि. 9 नोव्हेबर रोजी चोडण ग्रामसभेत घेतलेला खास ग्रामसभेचा ठराव पंचायत बैठकीत आपल्या अधिकार्‍याचा वापर करून फेटाळला गेल्याने मागणी केली खास ग्रामसभा ठराव फेटाळला.
8) पंचायतीने पुलासाठी खास ग्रामसभा न घेता दि. 8 मार्च, 2015 रोजी सर्वसाधारण ग्रामसभा घेण्याचा प्र्यन केला असता. पंचायतीचे मागील इतीवृत्तात वाचून घेऊन मागील ठरावानूसार खास ग्रामसभा प्रथम घ्यावी असा आग्रह करून ही ग्रामसभा तहकूब करण्यास सरपचाला व पंचाना भाग पाडले.
9) नतंरच्या तीन महिन्यात ही खास ग्रामसभा न घेण्याचा चंग पंचायतीने बाधला होता कायद्या नूसार ग्रामसभा पंचायतीला घ्यावीच लागते या नूसार पंचायतीने दि. 31 जून, 2015 रोजी सर्वसाधारण ग्रामसभा बोलाविण्यात आली. यात मोठया प्रमाणात पोलीस बळाचा वापर केला गेला. लोकानी खास ग्रामसभेचा प्र्श्न उपस्थित करून पुला संबधीची ग्रामसभा घेण्याची मागणी केली. सरपंच व एक जेष्ठ भाजपाचे कार्यकर्ते यांनी ही मागणी फेटाळली, बहुसंख्य ग्रामस्थानी मतदानाची मागणी केली असता तीही फेटाळली. या अन्यायाविरूध्द आवाज केलेल्या संघटनेच्या कार्यकत्याना धरपकडण्याचा आदेस दिला असता पोलिसानी यात जात लक्ष न दिल्याने शेवटी बहुसंख्य ग्रामस्थानी ग्रामसभेवर बहीष्कार टाकला.
10) गेल्या 18 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत पुला सबंधीचा खास ग्रामसभेत पुन्हा एकदा चर्चिला गेला गेला. संघटनेचे अध्यक्ष र्शीकृष्ण हळदणकर यांनी हा ठराव चोडणच्या जनतेसाठी कसा उपयुक्त आहे यांची माहिती ग्रामस्थाना करून दिली व खास ग्रामसभेचा ठराव एक मताने पुन्हा घेण्यास ग्रामस्थानी पंचायतीला भाग पाडले.
10) गेल्या दि. 16 ऑगस्ट, रोजी घेण्यात आलेल्या ठरावाला एक महिना उलटला तरी याची अजून अमलबंजावणी न झाल्याने युनायडेंट संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
11) चोडण पुलाचे बाधकाम त्वरित करण्यासाठी व सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी चोडण युनायडेंट संघटनेतर्फे गेल्या सोमवार दि. 28 सप्टेंबर, 2015 रोजी चोडण धक्क्यावर एक दिवशीय लक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थ व अनेक राजकीय पक्षाचे नेत सहभागी झाल्याने यशस्वी झाले होते.
12) आश्वानस दिलेल्या पुलाविषयी सरकार काहीच बोलत नसेल संघटनेच्या पुढील बैठकीत आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल असे सांगण्यात आले.

र्शीकृष्ण हळदणकर-चोडण.






Web Title: Chute Pool News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.