Nagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 10:54 AM2021-12-05T10:54:17+5:302021-12-05T10:54:41+5:30

Nagaland Firing : उच्च स्तरीय चौकशी केली जाणार असल्याची गृहमंत्री अमित शाह यांची मागणी.

Civilians soldier among 11 killed in firing incident in Nagalands Mon CM announces probe | Nagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या

Nagaland Firing : नागालँडमध्ये हिंसाचार, गोळीबारात ११ जणांचा मृत्यू; गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या

Next

Nagaland Firing : भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांच्या जवानांनी कथितरित्या त्यांच्यावर गोळीहार केला आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला.

या वृत्ताला नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी दुजोरा दिला. तसंच या घटनेची निंदा करत त्यांनी लोकांता शांतता राखण्याचं आवाहन केलं. याशिवाय या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं.


"नागालँडमध्ये घडलेल्या घटनेचं दु:ख आहे. ज्या लोकांचा यात मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेचा तपास करणार आहे," अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी ट्विटरद्वारे दिली. 

"मोन ओटिंगच्या नागरिकांची हत्या ही अतिशय दुर्देवी आणि नींदनीय घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती आहे. यात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर चांगली होईल अशी प्रार्थना करतो. उच्चस्तरीय एसआयटी या प्रकरणाचा तपास करेल आणि कायद्यानुसार न्याय दिला जाईल. सर्वांनी शांतता राखण्याचं मी आवाहन करत आहे," असं नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.

Web Title: Civilians soldier among 11 killed in firing incident in Nagalands Mon CM announces probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.