बंद घरात चोरट्याचा डल्ला; ५२ हजाराची रोकड लांबविली

By admin | Published: November 14, 2015 12:07 AM2015-11-14T00:07:57+5:302015-11-14T00:07:57+5:30

जळगाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी ते दुपारी पत्नीला माहेरी रावेरला सोडण्यासाठी गेले होते. तेथून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता घरी परत आले असता घराच्या दरवाजाच्या कुलूप तोडल्यासारखे जाणवले तर घरातील कपाटातून ५२ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटाचे कुलूप हे बनावट चाबीने उघडण्यात आल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वासुदेव सोनवणे करीत आहेत.

Clandestine scandal in the closed house; 52 lakhs of cash | बंद घरात चोरट्याचा डल्ला; ५२ हजाराची रोकड लांबविली

बंद घरात चोरट्याचा डल्ला; ५२ हजाराची रोकड लांबविली

Next
गाव: शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरात अजय ईश्वर घेंगट (वय ३२) यांच्या बंद घरातून ५२ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेंगट हे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. गुरुवारी ते दुपारी पत्नीला माहेरी रावेरला सोडण्यासाठी गेले होते. तेथून शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता घरी परत आले असता घराच्या दरवाजाच्या कुलूप तोडल्यासारखे जाणवले तर घरातील कपाटातून ५२ हजार रुपये रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटाचे कुलूप हे बनावट चाबीने उघडण्यात आल्याचा संशय आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वासुदेव सोनवणे करीत आहेत.

Web Title: Clandestine scandal in the closed house; 52 lakhs of cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.