लॉकडाऊनमध्ये गानप्रेमींना अॅपद्वारे शास्त्रीय संगीताचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:48 AM2020-04-28T03:48:40+5:302020-04-28T03:49:01+5:30
विकास करायला हा वेळ प्रत्येकाला सत्कारणी लावता येऊ शकतो. ज्यांना गाण्याची आवड आहे, असे अनेक लोक सध्या ‘रियाज’ या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत.
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपले छंद, आवड यांचा विकास करायला हा वेळ प्रत्येकाला सत्कारणी लावता येऊ शकतो. ज्यांना गाण्याची आवड आहे, असे अनेक लोक सध्या ‘रियाज’ या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत.
संगीत तंत्रज्ञान या विषयात पीएचडी केलेल्या गोपाला यांनी स्पेनमधील बार्सिलोना शहरातल्या एका संगीत गटाचे प्रमुख व प्राध्यापक झेवियर सेरा यांच्या मदतीने ‘रियाज’ हे अॅप तयार केले आहे. गोपाला यांनी सांगितले की, आपल्यापैकी अनेक लोक बाथरूम सिंगर असतात. संगीताचे व्यवस्थित शिक्षण घ्यावे, हा विचार मनात येऊनही ती गोष्ट करण्यास ते धजावत नाहीत. संगीत दर्जेदार पद्धतीने शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे.
हे अॅप गुगल प्ले स्टोअर, अॅपलच्या अॅप स्टोअर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या आधारे अनेक नवशिके लोक शास्त्रीय संगीत किंवा लोकप्रिय चित्रपट गीते कशी गायची, याचा अभ्यास करत आहेत. एखादा व्यक्ती ‘रियाज’ अॅपच्या माध्यमातून शास्त्रीय संगीतातील राग किंवा चीज
शिकला तरी ते गळ्यात घोटविण्याकरिता त्याला रियाज करावाच लागतो. त्यामध्ये गाणे शिकणाºयाला काही प्रश्न पडत असतील तर त्याची व्यवस्थित उत्तरे मिळण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे.
>तानपु-याची साथसंगत
भारतीय तसेच कर्नाटकी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींनी तयार केलेला उत्तम अभ्यासक्रम व सरावासाठी देण्यात आलेले शेकडो नमुने हे ‘रियाज’ अॅपचे वैशिष्ट्य असून, त्याचा मोठा फायदा शिकणाऱ्यांना होत आहे. गाताना साथीला लागणाºया तानपुºयाची स्वरसंगत, गाणाºयाचा आवाज व श्वासाबाबत निरीक्षण नोंदविणारी प्रणाली अशा सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे गाणे नव्याने शिकणाºया किंवा गळ््यातील गाणे घोटविणाºयांना हे अॅप अत्यंत उपयोगी आहे.