स्थलांतरित मजुरांसाठी योगींचा 'बिग प्लॅन'; 1 कोटी नवे रोजगार तयार करण्यावर लक्ष द्या, अधिकाऱ्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:42 PM2020-05-12T19:42:58+5:302020-05-12T20:08:39+5:30
लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या ...
लखनौ : उत्तर प्रदेशात प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळेल या दृष्टीने, या महिन्याच्या अखेरपर्यंत एक कोटीहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत. ग्रामीण भागांत मनरेगा, रोजगार निर्मितीचे एक उत्तम माध्यम बनू शकते. 23 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात, काही दिवसांतच 50 लाख लोकांना रोजगार देता येईल, असा आपला प्रयत्न असायला हवा, असे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
योगी म्हणाले, या घडीला जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणे हे सर्वात महत्वाचे काम आहे. मात्र, प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाने पूर्ण ताकदीनिशी आपली जबाबतारी पार पाडली तरच हे शक्य आहे.
आणखी वाचा - योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका, सहा प्रकारचे भत्ते कायमचे बंद
एका सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, योगींनी मंगळवारी आपल्या सरकारी निवासस्थानी जवळपास 35 हजार 818 ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमाने 225.39 कोटी रुपये मानधन ट्रांसफर केले आहे.
एमएसएमई देऊ शकते लाखो रोजगार -
मुख्यमंत्री म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अथवा एमएसएमई सेक्टरमध्ये लाखो लाकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने कन्नौजचे अश्वनी कुमार, वाराणसीच्या प्रेमलता, गोरखपूरचे असित कुमार मिश्रा, हरदोईच्या जूली सिंह आणि प्रतापगडचे रविसेन सिंह यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.