मथुरा - केरळमधील कोझिकोड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून अलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला. यात उत्तर प्रदेशातील मथुरा येथील को-पायलट अखिलेश कुमार यांचाही समावेश आहे. अखिलेश यांची पत्नी मेघा गर्भवती असून 15 ते 17 दिवसांत आई होणार आहे. पण, या अपघाताने, जन्माला येणाऱ्या या बाळाच्या डोक्यावरील छत्र जन्मापूर्वीच हिरावले गेले आहे.
अखिलेश आणि मेघा यांचे डिसेंबर 2017 मध्ये लग्न झाले होते. अखिलेश यांचा चुलत भाऊ बसुदेव यांनी सांगितले, की अखिलेश 2017 मध्येच एअर इंडियामद्ये पायलट म्हणून रुजू झाले होते. तसेच ते लॉकडाउनपूर्वीच शेवटचे घरी आले होते. एवढेच नाही, तर अखिलेश अत्यंत दयाळू, शांत आणि सभ्य व्यक्ती होती. अखीलेश यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असेही बसुदेव यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी दुबईहून आलेले एअर इंडियाचे विमान कोझिकोडा येथील धावपट्टीवर क्रॅश झाले. यात 190 लोक होते. त्यांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 150 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर घरी गेले आहेत. यासंदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली. याशिवाय त्यांनी अपघातात मरण पावलेल्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!
झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे