कोचीन शिपयार्डमध्ये स्फोट, पाच जणांचा मृत्यू तर 15 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:46 PM2018-02-13T12:46:57+5:302018-02-13T12:47:41+5:30
केरळातील महत्वपूर्ण कोचीन शिपयार्डमध्ये भिषण स्फोट झाला आहे.
कोचीन - केरळातील महत्वपूर्ण कोचीन शिपयार्डमध्ये भिषण स्फोट झाला आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओनजीसीचे सागर भूषण हे ड्रिल शिप डागडूजूसाठी कोचीन शिपयार्डमध्ये आणलं होतं. त्याचवेळी पाण्याच्या टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर तिथं आग लागली. आगीची तिव्रता लक्षात घेता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर निंयत्रण मिळवले आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे.
पोलिसांनी जहाजाच्या आजूबाजूच्या परिसराला घेरलं असून. घटनेचा तपास सुरु केला आहे.