चंदीगड/श्रीनगर : पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीरमध्ये रविवारीही थंडीचा कडाका कायम होता. दिल्लीमध्ये तापमानात किंचित घसरण झाली. या शहरात कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस होते.पंजाबमध्ये आदमपूरची सर्वात थंड ठिकाण म्हणून नोंद झाली. तिथे ३.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. लुधियाना, पतियाळा, हलवारा, भटिंडा, फरीदकोट, गुुरुदासपूर येथे अनुक्रमे ६.७, ७.६, ७, ५.३, ४, ८.१ अंश सेल्सिअस तापमान होते. हरयाणातील अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, सिरसा येथे अनुक्रमे ६.२, ६, ५.५, ६.२, ६.१, ५.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. चंदीगडमध्ये शनिवारी रात्री ६.६ अंश सेल्सिअस तापमान होते. अंबाला, हिस्सार, कर्नाल, नारनौल, भिवानी, अमृतसर, लुधियाना, पतियाळा इथे रविवारी सकाळी धुक्याचे प्रमाण वाढल्याने वातावरण आणखी धूसर झाले होते.काश्मीर खोरे व लडाखमध्ये शनिवारी रात्रीही तापमान गोठणबिंदूखाली होते. रविवारी सकाळी तिथे दाट धुक्याचे साम्राज्य पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, श्रीनगरमध्ये उणे २.८, पहलगाम येथे उणे १३.७, गुलमर्ग येथे उणे १३.४ अंश सेल्सिअस तापमान होते. लेहमधील लडाख येथे उणे १६.३ अंश सेल्सिअसवर रविवारी पारा स्थिरावला होता.राजस्थानलाही हुडहुडीराजस्थानमध्ये सिकरची सर्वात थंड ठिकाण म्हणून रविवारी नोंद झाली. तिथे व चुरू येथे अनुक्रमे २.४ व ४.४ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. पिलानी, गंगानगर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर येथे अनुक्रमे ४.५, ५, ६.३, ७.३, ७.५ अंश सेल्सिअस तर बिकानेर, कोटा, अजमेर, जयपूर येथे अनुक्रमे ८.२, ८.८, ९, १०.६ अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला होता.
पंजाब, हरयाणा, काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, दिल्लीत तापमानात घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:31 AM