सर्दीच्या लक्षणांमुळे लोक कमालीच्या मानसिक ताणतणावाखाली वावरत आहेत. सध्या शिंका येणे तर पाप झाले आहे. आयुर्वेदानुसार आलेली शिंक रोखून धरू नये. शिंक रोखल्याने डोकेदुखी, मान जखडणे इ. लक्षणे/आजार होतात. शिंका आल्याने डोके हलके वाटू लागते, हा सर्वांचाच अनुभव आहे. परंतु, यावर्षी शिंका येणे म्हणजे पाप झाले आहे. नाकातून पाणी येत असेल वा नुसते शिंकले तरी लोक दूर पळतात आणि ते अशा काही विचित्र नजरेने बघतात की, ‘फार मोठा गुन्हा केला आहे.’ शिंका येणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे.
वास्तविक, शिंका येणे ही निसर्गानेच साफसफाईसाठी केलेली एक प्रक्रिया आहे. जेव्हा धुळीचा एखादा कण नाकात जातो, तेव्हा नाकात असलेल्या बारीक केसांच्या जाळ्यात अडकतो. त्यामुळे नाकात त्रास, अस्वस्थता सुरू होते. तेव्हा स्वाभाविकच शिंका येऊन तो हानिकारक कण/पदार्थ बाहेर फेकला जातो. जेव्हा जीवाणू-विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शरीर शिंकेद्वारे त्यांना शरीरात प्रवेश करण्यास प्रतिकार करते. यामुळेच फ्लूसारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
आजच्या वैैद्यकीय शास्त्रानुसार, श्वसनमार्गातून शरीरात शिरकाव करणाऱ्या जीवाणू-विषाणूंना रोखण्यासाठी नाकात जो जास्त प्रमाणात स्राव निर्माण होतो, त्यालाच सर्दी म्हणतात. परंतु, आज सर्वांच्याच डोक्यात कोरोना इतका बसला आहे की, सर्दी, शिंका झाली/आल्या म्हणजे आपणास कोरोनाच झाला आहे, या संशयाने गर्भगळीत होतात. आज ‘सर्दी, पडसे, शिंका म्हणजे भित्यापाठी कोरोना’ अशी स्थिती झाली आहे. लोकांची ही मानसिकता अशी तयार होऊ लागली आहे की, आपला तो खोकला व दुसºयाचा तो कोरोना... यामुळेही भीती व गैरसमज होऊ लागले आहेत.वास्तविक, प्रत्येक सर्दी, नाक गळणे, शिंका म्हणजे कोरोना नव्हे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. एखाद्याला कोरोना आहे की नाही, ते कसे ओळखावे? सामान्यत: ज्या व्यक्तीला असा त्रास होतो, ती व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या सान्निध्यात आलेली असली पाहिजे. उदा. शेजारी कोरोनाबाधित व्यक्ती असणे, कोरोनाबाधित क्षेत्रातून प्रवास करणे, कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात सतत असणे. उदा. नर्स, डॉक्टर, सफाई कामगार, अन्य कर्मचारी, गर्दीच्या ठिकाणी जाणे, कामानिमित्त प्रवास करणे, अशा लोकांना सद्यस्थितीत कोरोना होण्याचा धोका जास्त असतो. यापैैकी तुम्ही नसाल तर तुमची सर्दी, शिंका कोरोनाच्या निश्चित नाहीत.आपली सर्दी, शिंका सामान्यत: कशाची असू शकेल, हे पुढीलप्रमाणे पडताळू शकता. १) कोरडा खोकला, शिंका = हवेतील बदल. २) खोकला, कफ, शिंका, नाक वाहणे, चोंदणे = सामान्य सर्दी ३) खोकला, नाक वाहणे, कफ, शिंक, अंगदुखी, अशक्तपणा, साधारण ताप = फ्लू. ४) सुका खोकला, शिंक, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडथळा व बºयापैैकी ताप = कोरोनाची शक्यता असू शकते.साध्या औषधोपचारांनी ही लक्षणे सहजपणे कमी न झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, पडसे यांचा मानसिक स्थितीशी अतिशय जवळचा संबंध आहे. या काळात कोरोनाच्या बातम्यांमुळे मनावर कोरोनाच्या भीतीचे दडपण असल्याने अगोदरच मानसिक स्थिती खराब झाल्याने, प्रत्येक सर्दी ही कोरोनाच वाटू लागली आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानेही वरचेवर सर्दी होऊ शकते. आजपर्यंत टाळेबंदी असूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आजूबाजूला कोरोनाबाधित असणारच आहेत, हे मनात ठेवून अत्यावश्यक गोष्टींशिवाय घरातून बाहेर पडू नका. बाहेर पडताना नाकावर व्यवस्थित मास्क लावा. शक्यतो कमीत कमी वस्तूंना हात लावा. वारंवार हात साबणाने धुवा. आपल्या व दुसºया व्यक्तीत जास्तीत जास्त अंतर ठेवा. लक्षात ठेवा, कोणीही तुमचे रक्षण करणार नाही. तुम्हालाच तुमच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्यायची आहे व कोरोनासोबतच जगायचे आहे. आता हवेद्वारेही कोरोनाचा प्रसार होत असल्याचे सिद्ध होत असल्याने आता घरीही मास्क वापरावा लागेल. शिंका येत असताना रुमाल समोर धरावा.बदलत्या पावसाळी वातावरणाबरोबरच सर्दी, पडसे, शिंका या प्रकारच्या तक्रारीही सुरू झाल्या आहेत. परंतु, दरवर्षीच्या या आजाराच्या तक्रारी व यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तक्रारींत खूप मोठा मूलभूत फरक आहे. सर्दी, पडशाच्या नेहमीच्या लक्षणांची यंदा भीती वाटू लागली आहे. या लक्षणांमुळे लोक कमालीच्या मानसिक ताणतणावाखाली वावरत आहेत. याला कारण आहे, कोरोनाचे डोक्यात/ डोक्यावर बसलेले भूत. सामान्यत: नाकातून पाणी येणे वा नाक चोंदणे, वारंवार शिंका येणे, डोळ्यांचा पुढील भाग दुखणे, याबरोबरच तोंडाला चव नसणे, सर्वांग दुखणे, कामात लक्ष न लागणे, अस्वस्थ वाटणे, काही वेळा अंग गरम वाटणे ही आहेत नेहमीच्या सर्दी, पडशाची लक्षणे. यावर्षी याच लक्षणांची भीती वाटू लागली आहे. कारण आहे फक्त कोरोना.