नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये 15 आणि 16 जून रोजी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान तेलंगणातील कर्नल संतोष बाबू हे शहीद झाले. तेलंगणा सरकारने संतोष बाबू यांच्या पत्नी संतोषी यांना सरकारी नोकरी देऊ केली आहे. उपजिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शहीद झालेल्या कर्नल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांची पत्नी संतोषी यांना उपजिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीचं पत्र दिलं.
के चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की संतोषी यांची पोस्टिंग हैद्राबाद जवळील परिसरात होईल. संतोषी या आपल्या आठ वर्षांच्या मुलीसह आणि तीन वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहत आहेत. संतोषी यांची आई हैद्राबादला राहते. कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्यानंतर तेलंगणा सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना 5 कोटी रुपयांची सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. संतोष यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संतोषी, मुलगी अभिज्ञा आणि मुलगा अनिरुद्ध आहे. प्रबोधिनितील 'हट ऑफ रिमेम्बरन्स' या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
देशासाठी मुलाने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, मला त्याचा अभिमान आहे अशी भावना संतोष यांच्या आईने याआधी व्यक्त केल्या होत्या. तसेच आपला एकुलता एक मुलगा आता कधीच परत येणार नाही या गोष्टीचं दु:ख देखील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 'सुरुवातीला आम्हाला जेव्हा हे समजलं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही. खूप मोठा धक्का बसला. माझ्या मुलाने अनेक आव्हांनाचा सामना केला आहे' अशा भावना संतोष यांच्या पालकांनी व्यक्त केल्या. शहीद कर्नल संतोष यांची आई मंजुळा यांनी 'देशासाठी माझ्या मुलाने बलिदान दिले याचा मला अभिमान आहे पण एक आई म्हणून आज मी दु:खी आहे' असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका
CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
प्रियंका गांधी लवकरच सरकारी बंगला सोडणार, 'या' ठिकाणी राहायला जाणार
"वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज"; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
कौतुकास्पद! कोरोनावर मात केल्यानंतर चक्क उद्योगपतीने ऑफिसला बनवलं रुग्णालय, मोफत देतोय उपचार
कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...