बोगस नळ शोधमोहिमेला नगरसेवकांची आडकाठी आयुक्तांचा गौप्यस्फोट: २१ ऑगस्टपासून घेणार मोहीम

By admin | Published: August 13, 2015 12:53 AM2015-08-13T00:53:36+5:302015-08-13T00:53:36+5:30

सोलापूर : शहरातील बोगस नळ शोधमोहीम न घेण्यासाठी काही नगरसेवकांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. त्या नगरसेवकांची नावे उघड करा म्हणून विरोधकांनी गोंधळ केला, पण आयुक्तांनी नाव उघड न करता सदस्यांचा पाठिंबा असेल तर २१ ऑगस्टपासून सर्व तयारीने ही मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा केल्यावर सभेतील वादळ शमले.

Commissioner of Police to snatch bogus taps: Campaign to be taken from August 21 | बोगस नळ शोधमोहिमेला नगरसेवकांची आडकाठी आयुक्तांचा गौप्यस्फोट: २१ ऑगस्टपासून घेणार मोहीम

बोगस नळ शोधमोहिमेला नगरसेवकांची आडकाठी आयुक्तांचा गौप्यस्फोट: २१ ऑगस्टपासून घेणार मोहीम

Next
लापूर : शहरातील बोगस नळ शोधमोहीम न घेण्यासाठी काही नगरसेवकांनी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. त्या नगरसेवकांची नावे उघड करा म्हणून विरोधकांनी गोंधळ केला, पण आयुक्तांनी नाव उघड न करता सदस्यांचा पाठिंबा असेल तर २१ ऑगस्टपासून सर्व तयारीने ही मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा केल्यावर सभेतील वादळ शमले.
जून महिन्यातील तहकूब सभा महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ३ विषयांवर ३ तास वादळी चर्चा झाली. सभेच्या सुरुवातीला विरोधी सदस्य जगदीश पाटील यांनी उजनी जलवाहिनीवर उघडकीला आणलेल्या चोरी प्रकरणाचे पुढे काय झाले यावर लक्षवेधी केली. प्रा. अशोक निंबर्गी यांनी उपअभियंता राठोड यांच्यावर कारवाई झाली काय, तर सुरेश पाटील यांनी महापालिकेचा कर्मचारी काकडे याने पाणी चोरी उघड करण्यास मदत केल्याने त्याला माफीचा साक्षीदार का केला नाही, असा सवाल केला. ॲड. यु. एन. बेरिया यांनी जलवाहिनीवरील पाणी चोरीनंतर शहरातील बोगस नळ शोधमोहीम हाती घेण्याची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित केला.
आयुक्त काळम-पाटील यांनी ॲड. बेरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोगस नळ शोधमोहीम राबविण्याची मी तयारी केली होती. पण काही सदस्यांनी दबाव आणल्याने काम थांबविले, असा गौप्यस्फोट केला. त्यावर सुरेश पाटील, जगदीश पाटील व इतर सदस्यांनी ते सदस्य कोण, त्यांची नावे जाहीर करा म्हणून गोंधळ केला. पण नावे जाहीर केल्यास त्याला वेगळे वळण लागू शकते. त्यामुळे मी ते टाळून सर्वांचा पाठिंबा असेल तर २१ ऑगस्टपासून ही मोहीम हाती घेतो असे स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी महापालिकेच्या हितासाठी ही मोहीम राबवा, असा आग्रह धरला. उजनी जलवाहिनीवरील मोहीम का थांबविली याला उत्तर देताना जलवाहिनी जमिनीखालून असल्याने कारवाईसाठी मोठी यंत्रणा लागते. यावर मोठा खर्च होत असल्याने सद्यस्थितीत हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आनंद चंदनशिवे यांनी मोहोळपासून शोधमोहीम राबवा. निंबर्गी यांनी कचरे यांच्या शेताजवळ जलवाहिनीची तपासणी करा, अशी मागणी केली. आयुक्तांनी यंत्राद्वारे जलवाहिनीची तपासणी करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. चेतन नरोटे यांनी आ. प्रणिती शिंदे यांच्या निधीतून हे यंत्र घेऊन देऊ, अशी घोषणा केली. (प्रतिनिधी)
इन्फो...
पाणी पुरवठा विभाग बेफिकीर
च्आजच्या सभेत पाणीपुरवठा विभागाविषयी तातडीचे विषय पटलावर होते. पण याबाबत माहिती देणारा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सदस्य संतप्त झाले. शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र, पंपहाऊस, पाण्याच्या टाक्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्तीचा विषय चर्चेला आला. अशोक निंबर्गी यांनी पाण्याच्या टाक्यांची सध्याची सुरक्षा काय, असा सवाल उपस्थित केला. पण उत्तर देण्यास कोणीच नसल्याने सदस्य संतप्त झाले. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी पोलीस आयुक्तांनी याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.
इन्फो...
परिवहन व्यवस्थापकाची भंबेरी
४एसएमटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बस पासच्या दरात बदल करण्यास मंजुरी मिळण्याचा विषय चर्चेला आला. त्यावर जगदीश पाटील यांनी बस जळीत प्रकरणाबद्दल माहिती विचारली. त्यावर प्र. परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे यांनी बसमध्ये आधुनिक इलेक्ट्रिक यंत्रणा असल्याने प्रकार घडल्याचे सांगितले. त्यावर निंबर्गी यांनी बसचे ऑडिट व विम्याचे संरक्षण आहे काय, असा सवाल उपस्थित केल्यावर खोबरे यांनी सांगितलेल्या माहितीवर सदस्यांचे समाधान झाले नाही. दिलीप कोल्हे यांनी बस खरेदी कोणाच्या अधिकारात झाली, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मनोहर सपाटे यांनी तत्कालीन आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात अशी खरेदी केली असेल तर चौकशी झाली पाहिजे, अशी सूचना केली. आनंद चंदनशिवे यांनी महिला बालकल्याण खात्याकडून परिवहनला १ कोटी ४0 लाखांचे अनुदान मिळत असताना एकाही शाळेजवळ बस थांबत नसल्याचे निदर्शनाला आणून दिले. पास विभागात घोटाळा करणार्‍यावर काय कारवाई केली असा सवाल केल्यावर खोबरे यांची भंबेरी उडाली. ॲड. बेरिया यांनी ही बाब गंभीर असल्याचे निदर्शनाला आणले. महापौरांनी पुढील सभेत परिवहनच्या कामकाजाबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश खोबरे यांना दिले.
इन्फो...
रस्त्याचा विषय फेरसादर
च्नगरोत्थान योजनेतून राठी टेक्स्टाईल ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत घेण्यात आलेला रस्ता एकतानगर चौक ते महालक्ष्मी मंदिर यादरम्यान १८ मीटर ऐवजी १५ मीटर करण्यास मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला. अतिक्रमणाला संरक्षण देण्यासाठी असा विषय आणल्याची उपसूचना पांडुरंग दिड्डी यांनी मांडली. आमणगी यांनी रस्त्याची रुंदी का कमी केली, असा सवाल केल्यावर नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांनी यादरम्यान उच्चदाब वाहिनी असल्याने बाजूला करण्यास मोठा खर्च येणार असल्याचे उत्तर दिले. उपमहापौर डोंगरे यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. मनोहर सपाटे यांनी टी. पी. तील रस्ता असेल तर बदल करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी पाहणी करून निर्णय द्यावा, असे बेरिया यांनी सूचित केले. वादळी चर्चेनंतर नगर अभियंत्यांनी स्पष्ट अभिप्राय द्यावा म्हणून विषय फेरसादर करण्यात आला.

Web Title: Commissioner of Police to snatch bogus taps: Campaign to be taken from August 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.