- संतोष ठाकूरनवी दिल्ली : येत्या दोन ते तीन महिन्यांत केंद्र सरकार इंटरनेट ट्रॅफिक मॅनेजमेंट अँड मॉनिटरींग समिती स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नेट न्युट्रिलिटीवर बनवल्या जाणाऱ्या बहुपक्षीय समितीपेक्षा ही समिती वेगळी असेल. या समितीचे कार्य देशात इंटरनेटची गती, त्यावर चालणारा डाटा आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी मानके निश्चित करण्यासह त्यावर देखरेख करण्याचेही असेल. ही समिती पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असेल व तिच्यात बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीचा समावेश नसेल.एक अधिकारी म्हणाला, इंटरनेटची गती, डाटासाठी नियम बनवून त्याच्या पालनाची गरज आहे.
इंटरनेट ट्रॅफिक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी येणार समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 5:28 AM