नवी दिल्ली : भारत सरकारने नेस्ले इंडियाकडे मॅगी प्रकरणी मागितलेल्या नुकसानभरपाईची रक्कम ६४० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नेस्ले इंडियाने मॅगी नूडल्स सदोष आणि घातक विकल्याबद्दल भारत सरकारने कंपनीकडे सध्या २८४.४५ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीडीआरसी) नेस्ले इंडियाविरुद्ध २८४.४५ कोटी रुपयांची प्राथमिक नुकसानभरपाई मागणारा अर्ज दाखल केला. दंड म्हणून ३५५.५० कोटी रुपयांची (एकूण ६३९.९५ कोटी रुपये) मागणी केली आहे.भरपाईची ही रक्कम प्रत्यक्ष अदा होईपर्यंत नेस्ले इंडियाला १८ टक्के व्याजही आकारले जाईल. मॅगी संदर्भातील वस्तुस्थिती व माहिती जसजशी समोर येईल त्याप्रमाणे आणखी नुकसानभरपाईची मागणी केली जाईल. नुकसानभरपाईची ही रक्कम ग्राहक कल्याण निधीत जमा केली जाईल.
नेस्ले इंडियाकडून भरपाई रक्कम ६४० कोटींपर्यंत
By admin | Published: August 13, 2015 1:57 AM