India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:00 AM2020-06-22T04:00:25+5:302020-06-22T04:00:52+5:30

दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे.

Complete freedom of the military to make peace with China | India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

Next

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गवलान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाºया २० भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी मारहाण करून ठार मारल्यानंतर यापुढे चीनने सीमेवर कोणतीही आगळिक केल्यास जराही गय न करण्याचा खंबीर पवित्रा भारताने घेतला आहे. यासाठी दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणातणी झाल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे बंधन यापुढे न पाळण्याचे भारकताने ठरविले असून वेळ पडल्यास सीमेवरील सैन्याला गोळीबार करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना होण्याआधी रविवारी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या स्थितीचा आठवडाभरात दुसºयादा आढावा घेतला. या बैठकीत वरीलप्रमाणे कठोर धोरण ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडनिरल करमबीर सिग व हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदुरिया यांनी भाग घेतला. सूत्रांनुसार केवळ भूसीमेवरच नव्हे तर हवाई हद्दीत व सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सागरी मार्गांवर चीनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संर७णमंत्र्यांनी सैन्यदलांना दिल्या. सीमारक्षणाच्या बाबतीत भारताने खंबीर भूमिका घेतली असल्याने चीनच्या कोणत्याही दुस्साहसाला करारी प्रत्यत्तर देण्याचे सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, असेही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. भारत व चीनमध्ये सीमेसंबंधी सन १९९६ व २००५ मध्ये झालेल्या करारांनुसार सीमेवर सैन्यांमध्ये तणातणीची वेळ आल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे ठरले आहे. मात्र एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने सांगितले की, आता दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. प्राप्त परिस्थिती हाताळण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे स्वातंत्र्य प्रत्यक्ष सीमेवर तैनात असलेल्या लष्करी कमांडरना देण्यात आले आहे.
गवलान खोºयातील घटनेनंतर भारताने सैन्याच्या जादा तुकड्या सीमेवर तैनात केल्या असून हवाईदलानेही गेल्या पाच दिवसांत लेह व श्रीमगर खेरीज सीमेवरील महत्वाच्या तळांवर सुखोई ३० एमकेआय, जग्वार व मिराज २००० या प्रबळ लढाऊ विमानांसह अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत.
>शस्त्रे, दारुगोळा खरेदीचे सैन्यदलांना विशेष अधिकार
सीमेवर मर्यादित अथवा पूर्ण क्षमतेच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी अत्यंत निकडीची अशी शस्त्रे व दारुगोळा तातडीने खरेदी करण्याचे विशेष वित्तीय अधिकारही सरकारने तिन्ही सैन्यदलांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख प्रत्येक वेळी 500 कोटी रुपयांपर्यंतची तातडीची खरेदी सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करू शकतील. उरी येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरचे ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही सैन्यदलांना असे अधिकार देण्यात आले होते.

Web Title: Complete freedom of the military to make peace with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन