“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:03 AM2024-01-01T11:03:05+5:302024-01-01T11:03:35+5:30

Congress Acharya Pramod Krishnam News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पलटवार केला आहे.

congress acharya pramod krishnam replied thackeray group mp sanjay raut criticism over ram mandir | “रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

“रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

Congress Acharya Pramod Krishnam News ( Marathi News ): अयोध्येत रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणानंतर आता सर्वांना आस लागली आहे ती, रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, एकाबाजूला सोहळ्याला जावे की नाही, यावरून विरोधकांमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या सोहळ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पंतप्रधान कार्यालय अयोध्येत हलवावे. कारण हे सरकार अयोध्येतूनच चालेल. हे लोक आगामी काळात रामाच्या नावाने लोकांची मते मागतील. कधी पुलवामासारखा हल्ला घडवून आणतील तर कधी आमच्यापेक्षा मोठा रामभक्त कोणीही नाही, असे म्हणतील. राम मंदिरासाठी आम्ही, आमच्या पक्षाने आणि आमच्या लोकांनी सगळे काही दिले आहे. प्रसंगी रक्त सांडले आहे. पण आम्ही कधी असले राजकारण केले नाही, भविष्यात करणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उत्तर देत, चांगलाच पटलवाट केला आहे. 

रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही

प्रभू श्रीरामांचा विरोध करणारे हे लोक नास्तिक आहेत. त्यांना भारताच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. श्रीरामांचा विरोध करायचा आणि भारतात राजकारण करायचे, हे वाईट आहे. अशा राजकारण्यांमुळे भारतातील जनतेला दुःख होते. आता राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हा भारताचा उत्सव आहे. या उत्सव काळात नकारात्मकतेला थारा असू नये. ही आपली संस्कृती नाही. ज्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले ते त्यांचे सौभाग्य आहे. निमंत्रण मिळूनही जे लोक मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत हे त्यांचे दुर्भाग्य आहे, अशी टीका कृष्णम यांनी केली.

दरम्यान, अशी टीका होणे आपल्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. लोकशाहीत असे काही होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करा, त्यांच्या निर्णयांचा निषेध नोंदवा. परंतु, त्यांचा तिरस्कार करू नका. काही लोक मोदींचा तिरस्कार करण्यात स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. विरोधी पक्षतील काही नेते असे आहेत ज्यांनी स्वतःचे सरकार पाडले आहे. हा स्वतःचा सत्यानाशच आहे. ही मोठी नारात्मकता आहे. लोकशाहीत नकारात्मकतेला स्थान असू नये, असे प्रमोद कृष्णम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
 

Web Title: congress acharya pramod krishnam replied thackeray group mp sanjay raut criticism over ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.