शीलेश शर्मानवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताज्या वक्तव्यावरून काँग्रेसला सरकारवर हल्ले व आरोप करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. भाजपाला त्यामुळे चार पावले मागे जावे लागले. हेगडे याच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र हल्ला करताना घटनेत बदल करण्याचे कोणतेही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की घटनेचा अपमान करणे हे भाजपाच्या चारित्र्याचे एक अंगच बनले आहे.वस्तुस्थिती ही आहे की भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुळातच घटनेच्याविरोधात आहेत. घटनेच्या कोणत्या कलमांबद्दल आक्षेप आहे म्हणून ते बदलायला निघाले आहेत हे भाजपा आणि मोदी यांनी सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.एकट्या हेगडेंवरच नव्हे, तर काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वक्तव्याबद्दलही आक्षेप घेतला आहे. हे अहिर अहंकारात मस्त आहेत, असा काँग्रेसचा आक्षेप आहे. अहिर डॉक्टरांना गोळ्या घालू इच्छितात; कारण का तर डॉक्टर्स त्यांच्या कार्यक्रमात उपस्थितनव्हते.हे दोन मुद्दे काँग्रेसच्या हाती लागले असून उद्या (बुधवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांत ते जोरदारपणे उपस्थित करण्याचा ते प्रयत्न करतील.>शेकडो दुरुस्त्या झाल्या, भविष्यातही होतीलअनंतकुमार हेगडे यांनी घटनेतील धर्मनिरपेक्ष शब्दालाच आक्षेप घेतला होता. मी घनटेचा सन्मान करतो परंतु घटनेत शेकडोवेळा दुरुस्त्या झाल्या आहेत व भविष्यातही त्या होतील. आम्ही घटनेत बदल करण्यासाठी सत्तेत बसलो आहोत व आम्ही बदल घडवू, असे ते म्हणाले होते.
हेगडेंच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:58 AM