Congress Bharat Jodo Yatra: फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:14 PM2022-10-06T22:14:48+5:302022-10-06T22:15:20+5:30
राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला आहे.
Congress Bharat Jodo Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या पक्षाच्या 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला असून, तो पुढे जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे काही व्हिडिओही समोर येत आहेत. एका नवीन व्हिडिओमध्ये राहुल गांधी यात्रेदरम्यान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यासोबत धावताना दिसत आहेत.
Fit, Fab & Fun! 😁#BharatJodoYatrapic.twitter.com/hb07AMgIfn
— Congress (@INCIndia) October 6, 2022
काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांचा हात धरला आणि नंतर पळायला सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 75 वर्षीय सिद्धरामय्याही राहुल यांच्या बरोबरीने धावताना दिसत आहेत.
आईच्या बुटाची फीत बांधली
परवरिश #BharatJodoYatrapic.twitter.com/llcwV6HCUD
— Congress (@INCIndia) October 6, 2022
'भारत जोडो' यात्रेतील इतर काही व्हिडिओ आणि फोटोही आज समोर आले. ताज्या व्हिडिओंपैकी एक सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आहे. यामध्ये राहुल सोनिया गांधींच्या बुटाचे फीते बांधताना दिसत आहेत. सोनिया आज भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.
We care! pic.twitter.com/Jbx7T261yL— Congress (@INCIndia) October 6, 2022
या प्रवासादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सोनिया गांधी या प्रवासादरम्यान एका मुलीला भेटताना यात दिसत आहे. गर्दीमुळे मुलगी पडते, सोनिया तिला जवळ बोलावतात आणि तिची विचारपूस करतात.
काँग्रेसच्या या 'भारत जोडो' यात्रेला राहुल गांधी यांनी केरळमधून सुरुवात केली आहे. सुमारे 150 दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास एकूण 3500 किलोमीटरचा आहे. हा प्रवास 12 राज्यांमधून जाणार आहे. सध्या केरळमधून कर्नाटकात ही यात्रा पोहोचली आहे.