कर्नाटकात 'काँग्रेस-जेडीएस'चं गणित जुळलं, जागावाटपाचा तिढा सुटला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 09:12 PM2019-03-13T21:12:57+5:302019-03-13T21:59:19+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे.
बंगळुरु : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातकाँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे.
कर्नाटकात एकूण 28 जागा आहेत. यापैकी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर जेडीएस आठ जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. याआधी कर्नाटकात जेडीएसने लोकसभा निवडणुकीसाठी 28 पैकी 12 जागा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही पक्षात चर्चा झाल्यानंतर जेडीएसने 8 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Karnataka:Congress and JDS seat sharing done. Congress to contest on 20 seats and JD(S) to contest on 8 seats out of the 28 Lok Sabha seats pic.twitter.com/HmkD4esdYT
— ANI (@ANI) March 13, 2019
दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडीमुळे कर्नाटकात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 28 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 9 आणि जेडीएसने दोन जागांवर विजय मिळवला होता.
Karnataka: Congress to contest on 20 seats and JD(S) to contest on 8 seats out of the 28 seats. #LokSabhaElections2019pic.twitter.com/MLWZkkqnw6
— ANI (@ANI) March 13, 2019