बंगळुरु : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातकाँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे.
कर्नाटकात एकूण 28 जागा आहेत. यापैकी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर जेडीएस आठ जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. याआधी कर्नाटकात जेडीएसने लोकसभा निवडणुकीसाठी 28 पैकी 12 जागा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही पक्षात चर्चा झाल्यानंतर जेडीएसने 8 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडीमुळे कर्नाटकात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 28 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 9 आणि जेडीएसने दोन जागांवर विजय मिळवला होता.