"काँग्रेसने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना बनविले मूर्ख"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:15 AM2019-03-05T06:15:02+5:302019-03-05T06:15:18+5:30

काँग्रेस सरकारांनी शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम केले. वेळोवेळी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची मते मिळवली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली

"Congress created fools by giving tax free" | "काँग्रेसने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना बनविले मूर्ख"

"काँग्रेसने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना बनविले मूर्ख"

Next

जामनगर : काँग्रेस सरकारांनी शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचे काम केले. वेळोवेळी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची मते मिळवली अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. गुजरातमधील विविध योजनांची उद्घाटने व पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
मोदी म्हणाले की, शेतकºयांच्या दु:स्थितीबद्दल काँग्रेस दर दहा वर्षांनी गळा काढते. शेतकºयांची कर्जे माफ केली जातात. अशा प्रकारे केंद्रातील काँग्रेस सरकारांनी शेतकºयांची ५२ हजार कोटी रुपयांची कर्जेे माफ केली व त्यांची मते आपल्याकडे वळवली. मात्र या कर्जमाफीमुळे देशाच्या डोक्यावर ६ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नाही.
काँग्रेसने गरीबी हटावचा नारा देऊन लोकांना मूर्ख बनविले. आता शेतकºयांना कर्जमाफी देण्याच्या घोषणा करून काँग्रेस पुन्हा तोच जुना खेळ खेळत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा ही मागणी काँग्रेसने कधीही मान्य केली नाही. कर्नाटकात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा केली. पण मोजक्या शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ झाला. काँग्रेस १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना कडक शिक्षा करण्यातही अपयशी ठरली, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
कोची अन् कराचीची गफलत : आयुष्मान योजनेच्या अंतर्गत जामनगरमधील एखाद्या नागरिकाला देशभरात ‘कोलकातापासून कराचीपर्यंत' कुठेही वैद्यकीय उपचार घेता येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. मग त्यांना आपली चूक लक्षात आली. ती त्वरित सुधारताना मोदी म्हणाले, खरे तर कोलकातापासून कोचीपर्यंत असे मला म्हणायचे होते. मात्र सध्या शेजारी राष्ट्राने सुरू ठेवलेल्या कारवायांमुळे त्याचाच विचार मनामध्ये असतो. त्यामुळे कोचीऐवजी कराची असा उल्लेख झाला.

Web Title: "Congress created fools by giving tax free"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.