नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये अद्यापही घमासान सुरु असल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे नवीन ट्विट पुन्हा एकदा वाद निर्माण करू शकते. ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा चालू असतो, त्यावेळी विरोध नेहमी ऐच्छिक असतो आणि समर्थन नेहमी व्यवस्थापित करण्यात येते, असे कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी पुन्हा ट्विट केले आहे. "ज्यावेळी तत्त्वांसाठी लढा दिला जात आहे, तर आयुष्यात, राजकारणात, न्यायामध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये, सोशल मीडिया मंचांवर ऐच्छिक असतात. मात्र, समर्थन बरेचदा व्यवस्थापित केले केले जाते," असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मंगळवारी सुद्धा कपिल सिब्बल यांनी ट्विट केले होते. त्यावेळी 'माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा' असे ट्विट केले होते. त्यामुळे कपिल सिब्बल काँग्रेसशी बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते.
यापूर्वी कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत सर्वसमावेशक बदल करण्याची आणि पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती. तसेच, पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
संजय झा यांचा काँग्रेसवर निशाणा काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या संजय झा यांनीदेखील भाष्य केलं आहे. ही अंताची सुरुवात आहे, अशा शब्दांत झा यांनी काँग्रेसमधील घडामोडींवर निशाणा साधला आहे. झा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसचा कुठेही उल्लेख नाही. मात्र त्यांचं ट्विट काँग्रेसमधील कुरबुरींवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या १०० हून अधिक नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचं संजय झा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र त्यांचा दावा काँग्रेसनं खोडून काढला होता.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय? देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं होतं.
आणखी बातम्या...पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस... स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...