नवी दिल्ली : हेराल्ड हाऊस प्रकरणी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला 56 वर्ष जुने हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडने(एजेएल) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले.
गेल्या 30 ऑक्टोबरला 'एलएनडीओ'ने नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडला(एजेएल) नोटीस पाठवून 15 नोव्हेंबरपर्यंत हाऊस खाली करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात असोसिएट जर्नल्स लिमिटेडने गेल्या 12 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावेळी दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवरील निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर याप्रकरणी आज सुनावणी झाली.