अमेठी - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल करारावरुन पंतप्रधान नरेंद मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. यापूर्वीही राजस्थानमधील आयोजित सभेत बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांचा 'चोर' असा उल्लेख केला होता.
नेमके काय म्हणाले होते राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की, मी या देशाचा पंतप्रधान नाही, तर मी या देशाचा चौकीदार आहे. राहुल यांनी मोदींच्या या वाक्याचा संदर्भ देत 'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है', अशा शब्दात मोदींची खिल्ली उडवत त्यांच्यावर चोरीचा आरोप केला.
देशातील नागरिकांच्या हृदयातून आज एकच आवाज बाहेर येत आहे. 'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है', हाच तो देशातील नागरिकांचा आवाज असल्याचे राहुल यांनी म्हटले.
(Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?')
(Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये)
दरम्यान, कैलास मानसरोवरची यात्रा केल्यानंतर सोमवारपासून राहुल गांधी आपला मतदारसंघ अमेठीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. अमेठीत दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी येथील शिवमंदिराला भेट देत तेथे पूजा-अर्चना केली. यादरम्यान, उपस्थितांनी भगवान शंकराच्या नावाचाही जयघोष केला.