काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:58 AM2017-12-17T05:58:25+5:302017-12-17T05:58:25+5:30

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

Congress in Rahul Park, accepted the post of party president, Modi and BJP clampdown | काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

Next

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या समारंभाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व राज्यांमधील महत्त्वाचे सारे नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.
राहुल गांधी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपावर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला २१व्या शतकात नेले; मात्र, आमचे पंतप्रधान आम्हाला मध्ययुगाकडे नेत आहेत. देशात दडपशाही, मारहाण केली जाते. लोकांना मारून टाकले जात आहे. कोणी काय खायचे, कोणी काय परिधान करायचे, हेही सत्ताधारी ठरवत आहेत.
हा हिंसाचार लज्जास्पद आहे, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होत आहे. या सरकारने देशाचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी
पदभार स्वीकारला
राहुल गांधी यांनी वयाच्या ४७व्या वर्षी १३२ वर्षे जुन्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने त्यांना ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. या वेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.

मान्यवरांकडून शुभेच्छा
काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
राहुल गांधी यांना द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, अभिनेते कमल हासन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या मोठ्या जबाबदारीसाठी व आपल्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.

१९७१च्या युद्धातील
शहिदांना आदरांजली
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय दिवसाच्या निमित्ताने १९७१च्या युद्धातील भारतीय शहिदांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, १९७१च्या युद्धातील शहिदांच्या साहस आणि बलिदानाला सलाम. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले त्या शूरवीरांची आठवण करू या. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. या युद्धानंतर बांगलादेशाची स्थापना झाली होती.

ते संपवण्याची भाषा करतात,
आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो!
भाजपाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, गत काही वर्षांत काँग्रेसला कमजोर करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ते जेवढा द्वेष, राग दाखवतील तेवढेच आम्ही मजबूत होऊ. भाजपा स्वत:साठी लढत आहे; तर, काँग्रेस देशातील प्रत्येक बहीण-भावासाठी लढत आहे.

Web Title: Congress in Rahul Park, accepted the post of party president, Modi and BJP clampdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.