CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:04 PM2019-12-22T17:04:41+5:302019-12-22T17:07:02+5:30

'ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या होत्या.'

Congress, urban Naxals spreading rumours over CAA, NRC: Modi | CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी 

CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत -  नरेंद्र मोदी 

googlenewsNext

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केले. यावेळी राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसवत आहेत, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.

देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 


देशात कुठेही डिटेंशन कॅम्प अस्तित्वात नाहीत. ज्यांचे पूर्वज भारताचे सुपूत्र आहेत अशा भारतातील मुस्लिमांचा राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याशी काहीही संबंध नाही. त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठविण्यात येणार नाही, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. याचबरोबर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही सडकून टीका केली. तसेच, त्या अफवा पसरवत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केला.

ममता बॅनर्जी कोलकातातून थेट संयुक्त राष्ट्रात पोहोचल्या होत्या. याच ममता बॅनर्जी घुसखोरी रोखा, बाहेरुन येणाऱ्या शरणार्थींना नागरिकत्व द्या, अशी मागणी करत होत्या. ममता बॅनर्जींना आता काय झाले, त्या आता का बदलल्या, का आता त्या अफवा पसरवत आहेत? निवडणुका होतात, जातात. पण, तुम्ही का भयभीत झालात? अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.  


याचबरोबर, भारताचे जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांसोबत चांगले संबंध आहेत. तसेच गेल्या 5 वर्षात मुस्लीम देशांनी अनेक भारतीय कैद्यांना सोडले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवे आयुष्य मिळेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. देशात आंदोलने सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचे आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. 

माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल 

आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

 

Web Title: Congress, urban Naxals spreading rumours over CAA, NRC: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.