'काँग्रेसचा पराभव झाल्यास सीएमपदाचा राजीनामा देईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 07:17 PM2019-05-17T19:17:58+5:302019-05-17T19:25:23+5:30
लोकसभा निवडणूक 2019च्या मतदान प्रक्रियेचा काळ सुरू आहे.
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या मतदान प्रक्रियेचा काळ सुरू आहे. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे की, जर राज्यात काँग्रेस निवडणूक हारली तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. इतकंच नव्हे, तर त्यांनी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना काँग्रेसच्या कामगिरीची जबाबदारी सोपवली आहे.
तत्पूर्वी 14 मे रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी आरोप केला होता की, अमरिंदर सिंग यांच्यामुळेच पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट मिळालं नाही. परंतु अमरिंदर सिंग यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Punjab Pradesh Congress Committee:Allocation was done by Congress high command in Delhi&they'd chosen not to accept Navjot Kaur’s application for ticket to contest from Chandigarh,he said,adding Chandigarh wasn't under Punjab&he had no role in selection of candidate from the city https://t.co/yI8vT91ZcA
— ANI (@ANI) May 17, 2019
आम्ही अमृतसरमधल्या बठिंडा जागेवरून त्यांना तिकीट देत होतो. पण ती तिथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. तिकीट वाटपाचं सर्वच काम दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांकडे होतं. त्याच माझी कोणतीही भूमिका नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.