पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार; प्रियंका गांधी असणार केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:30 AM2019-10-09T05:30:58+5:302019-10-09T05:35:02+5:30

प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल.

Congress will devise strategies to strengthen the party; Priyanka Gandhi will be at the center | पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार; प्रियंका गांधी असणार केंद्रस्थानी

पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार; प्रियंका गांधी असणार केंद्रस्थानी

Next

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : हिंदी भाषिक राज्यांत पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार उत्तर प्रदेशची प्रभारी असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत.
प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल.
उत्तर प्रदेशमध्ये दशकांपासून सत्तेपासून वंचित राहिलेला काँग्रेस पक्ष आता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी राज्याच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन मंडळात सामावून घेऊन राज्याची सूत्रे तरूण नेत्यांच्या हाती सोपवली आहे. दोन वेळा आमदार असलेले अजय कुमार लल्लू यांना गांधी यांनी राज बब्बर यांच्या जागी अध्यक्ष नियुक्त केले तर १२ सरचिटणीस, ४ उपाध्यक्ष, १८ सल्लागार समिती सदस्य आणि ८ कार्यकारी दल स्थापन केले आहेत.
कार्यकारी दल क्षेत्रनिहाय प्रदेशांची वाटणी करून आपापल्या क्षेत्रासाठी रणनीती बनवण्याचे काम करतील व त्यांची देखरेख स्वत: प्रियंका गांधी करतील. प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशचे राजकारण दिल्लीत बसून करणार नाहीत तर आता त्यांनी लखनौमध्ये शीला कौल यांच्या निवासस्थानाला स्थायी निवासस्थान बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या आठवड्यातील चार दिवस लखनौत थांबतील.
पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गेल्या एक आठवड्यात प्रियंका गांधी यांनी प्रदेशातील नेत्यांना बोलावून घेऊन सातपेक्षा जास्त बैठका घेतल्या व त्यानंतर हे पाऊल उचलले. बैठकीत प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत जे काही झाले ते झाले. २०२२ मध्ये काँग्रेसला कोणत्याही किमतीवर उत्तर प्रदेशची सत्ता मिळवायची आहे. आणि त्या दिशेने पंचायत स्तरापासून ते जिल्हा आणि जिल्ह्यापासून राज्यापर्यंत संघटन आधी उभे केले जावे व त्यासाठी प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची उपस्थिती सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

Web Title: Congress will devise strategies to strengthen the party; Priyanka Gandhi will be at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.