नवी दिल्ली : येत्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या काँग्रेसच्या तिजोरीत सध्या ठणठणाट आहे. कार्यालयांचा खर्च भागवणेही अवघड असून, त्यामुळे मोदींचा सामना करणे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यांना कार्यालये चालवण्यासाठीचा निधी थांबवला आहे. काँग्रेसने सदस्यांकडेच निधी जमवण्याची आणि पक्ष कार्यालयाचा खर्च कमी करण्याची विनंती केली आहे.पक्षाचा सोशल मीडिया विभाग सांभाळणाºया दिव्या स्पंदना यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या पैसाच नाही. भाजपाच्या तुलनेत बाँडमधूनही कमी निधी मिळत आहे. त्यामुळे आॅनलाइन लोकवर्गणीद्वारे निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.कधी काळी देशातील उद्योग काँग्रेसला निधी देण्यासाठी पुढे येत. आता ती संख्या कमी झाली आहे. उद्योगपती भाजपाकडे आकर्षित झालेले असून, त्यांचा सर्वाधिक निधी भाजपाला जात आहे. याचा फटका काँग्रेसला येत्या २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षही उद्योगांसाठी फारसे जवळचे नाहीत.निवडणुकांमध्ये पैसा कमी असेल तर पक्षाला मोठा फटका बसतो. हेच काँग्रेसबाबत होऊ शकते.- जगदीप चोकर, संस्थापक,असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सचहाचा खर्चही महागविमानाचे तिकीटच नाही तर पक्ष कार्यालयात येणाºया-जाणाºयांना करावा लागणारा पाहुणचारही सध्या काँग्रेसला परवडत नाही, अशी स्थिती आहे.
काँग्रेसची तिजोरी रिकामी, मोदींचा सामना करायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:18 AM