शिमला/नवी दिल्ली :
आपल्या शब्दांमुळे जर कोणी दुखावले असेल तर त्याबद्दल आपण संबंधित मुलाची, त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या मित्रांची माफी मागतो, असे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी सोमवारी म्हटले.
तिबेटी धर्मगुरू एका बालकाला त्यांचे चुंबन घ्यायला सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हा व्हिडीओ दोन मिनिटे पाच सेकंदांचा आहे. दलाई लामा यांना राजनैतिक संरक्षण असल्याने सरकार काय कारवाई करता येईल याची चाचपणी करत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तिबेटी आध्यात्मिक मुख्य कार्यालयाने याबाबत माफी मागितली आहे.