लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट्स आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या रुग्णालयातील ४८० आरोग्यसेवकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये १९ डॉक्टर व ३९ नर्सचा समावेश आहे. त्यातील डॉक्टरांपैकी दोन जण या रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर बाकीचे १७ जण हे निवासी डॉक्टर आहेत.त्याशिवाय एम्समधील ७४ सुरक्षारक्षक, ७५ मदतनीस, ५४ स्वच्छता कामगार, प्रयोगशाळेतील १४ तंत्रज्ञ व आॅपरेशन थिएटरमधील कर्मचारी यांनाही कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. या आजारामुळे एम्स रुग्णालयातील तीन आरोग्यसेवक मरण पावले. त्यामध्ये रुग्णालयाच्या स्वच्छता कामगारांच्या प्रमुखाचा समावेश आहे. या रुग्णालयाच्या जेवणघरात काम करणाऱ्या एका कर्मचाºयाचा कोरोनामुळे बळी गेला आहे.कोरोनाचा वाढता फैलाव पाहता एम्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची घ्यावीतितकी नीट काळजी घेतली नाही,असा आरोप रेसिडेन्ट डॉक्टर्स असोसिएशनने केला आहे. याच मुद्द्यावरून एम्स रुग्णालयातील नर्सच्या संघटनाही गेल्या तीन दिवसांपासून निदर्शने करत आहेत. रुग्णालयाने दिलेलेङ्घपीपीई संच निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप या नर्सनी केला आहे. रुग्णालयात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
एम्समधील ४८० आरोग्यसेवकांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 5:18 AM