नवी दिल्ली : आर्थिक चणचणीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नसल्याने आणि आर्थिक संकटातून सावरण्यासाठई कंपनीने आता आपल्या कर्मचाºयांना ५ वर्षांपर्यंत बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांना कर्मचा-यांना विनापगार सुटीवर पाठवण्याचे अधिकार देण्यात आल्याचे समजते.कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे. कोणत्या कर्मचाºयांना अशा सुटीवर पाठवायचे याचा निर्णय त्याचे आरोग्य आणि काम करण्याची क्षमता आदी बाबींचा विचार करून घेतला जाणार आहे. याबाबत कंपनीच्या विविध विभागात प्रमुख सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणार आहेत. ही सुटी घेतलेल्या काळात या कर्मचाºयांना अन्य कोणत्याही विमान कंपनीत काम करता येणार नाही. या काळात वेतन दिले जाणार नसले तरी अन्य मेडिकलच्या सुविधा मात्र मिळू शकणार आहेत. या कंपनीत सध्या १३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्च महिन्यात एअर इंडियाने कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)
कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:47 AM