कोरोनाची महामारी : जैन ओघ निर्युक्ती सूत्रात २४०० वर्षांपूर्वीच दिले होते सल्ले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:41 AM2020-09-03T03:41:27+5:302020-09-03T03:42:10+5:30
सामाजिक अंतराबद्दलही स्पष्ट दिल्या होत्या सूचना; जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यातही समानता
अहमदाबाद : कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीला स्पर्श करणे गरजेचेच असेल तर उघड्या हातांनी स्पर्श करू नका. हात अगदी स्वच्छ व आठवणीने धुवा. बाधा झालेल्या व्यक्तीला वेगळे (आयसोलेट) ठेवा आणि बाधा इतरांनाही होऊ नये यासाठी एकमेकांपासून अंतर कटाक्षाने राखा. हा सल्ला अखंडपणे केंद्रीय आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देईलही; परंतु हा सल्ला जैन साधू आणि साध्वींना तब्बल २४०० वर्षांपूर्वी दिलेला होता.
जैन मुनी अजितचंद्रसागर यांनी सांगितले की, जैनीझममधील आगम्सपैकी एक ओघ निर्युक्ती सूत्राचा अभ्यास करताना मी १४ ते १९ कडव्यांपर्यंत आलो. एवढेच काय त्या युगात लेखक भद्रबाहू स्वामी यांनी नवे साधू आणि साध्वींना सल्ला दिला होता की, आरोग्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो.
पुरातन पवित्र ग्रंथांना महामारीची कल्पना नव्हती. जो मजकूर आयुर्वेदाशी संबंधित आहे त्यात जानपधोध्वांसचा उल्लेख आहे
त्यात अशा आजारांचा उल्लेख आहे की, ते पुरातन भारतातील संपूर्ण जानपदाला उद्ध्वस्त करू शकतील, असे येथील वैद्य प्रवीण हिरापारा म्हणाले.
त्यात असेही म्हटले की, अशा घरांतील पाणी किंवा अन्नही तपस्वी वा संन्याशीने घेऊ नये. मीठ किंवा द्रवरूपातील अन्न, लोकरीचे बनलेले कपडे आणि लोखंडापासून बनवलेली भांडी यांना स्पर्श केला जाऊ नये. त्यापासून व्यक्तीला दीर्घकाळपर्यंत बाधा होऊ शकते, असे सूत्रात म्हटले आहे.
मुनी त्रिलोक्यमानदनविजय म्हणाले की, सामाजिक अंतराची (सोशल डिस्टन्सिंग) कल्पना आता समोर आली; पण त्याबद्दल आधीच पवित्र ग्रंथात नमूद करण्यात आले आहे की, साधू आणि साध्वींनी साथ असलेल्या भागांत गटागटांनी प्रवास (विहार) करायला नको. ‘‘हे मी दोन वर्षांपूर्वी वाचले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने सल्ला दिल्यानंतर आम्हाला हे आढळले की, २४०० वर्षांपूर्वी जे शिकवले गेले त्यात व ताज्या सल्ल्यात सारखेपणा आहे’’, असे ते म्हणाले.
ते असेही म्हणाले की, ‘‘ते कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नाही; परंतु आम्ही एक समाज म्हणून विचार केला, तर आम्हाला महामाऱ्या काही नव्या नाहीत व त्या कशा नियंत्रणात आणायच्या हे आम्हाला माहीत आहे.
स्वतंत्र खोलीत ठेवण्यात यावे...
पवित्र ग्रंथात असा उल्लेख आहे की, ज्यांना बाधा झाली आहे त्यांना स्वतंत्र खोलीत ठेवले जावे. ते जर तसे शक्य नसेल तर त्या व्यक्तीला खोलीच्या कोपºयात ठेवावे व त्याला कापडाने झाकावे.
ग्रंथात असेही म्हटले म्हटले की, बाधित व्यक्ती ज्या रस्त्याने गेली तो रस्ता इतरांनी वापरू नये व कोणीही बाधित व्यक्तीच्या जवळ थांबू नये. जर बाधित साधूचे निधन झाले तर त्याच्याजवळच्या वस्तूंची विल्हेवाट लावावी व त्या इतर कोणीही वापरू नयेत.