कोरोना काळात व्यापाऱ्यांवर कोसळलं मोठं संकट; एका वर्षात 11,716 व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:11 AM2021-12-01T10:11:25+5:302021-12-01T10:11:55+5:30
गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.
नवी दिल्ली - कोरोनाचा आरोग्यसह अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच 2019 च्यातुलनेत 2020 मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 मध्ये तब्बल 11716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली. 2019च्या तुलनेत हे प्रमाण तब्बल 29% अधिक आहे. अर्थात 2020 म्हणजेच कोरोना काळात व्यापारी वर्गाने कृषी क्षेत्राशी संबंधित लोकांपेक्षाही अधिक आर्थिक तणाव आणि संकटाचा सामना केला आहे.
गृह मंत्रालयाने एनसीआरबी (NCRB)चा रिपोर्ट Accidents and Suicides in India च्या हवाल्याने सांगितले, की 2019 मध्ये व्यापाराशी संबंधित असलेल्या 9052 लोकांनी आत्महत्या केली होती, तर 2020 मध्ये 11,716 लोकांनी आत्महत्या केली.
शेतकऱ्यांहून अधिक व्यापाऱ्यांनी केली आत्महत्या -
एनसीआरबीने आत्महत्या प्रकरणांची विभागणी केलेली नाही. मात्र, आत्महत्या करणारे बहुतांश व्यापारी एमएसएमई क्षेत्राशी संबंधित होते, असे म्हणता येणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 11,716 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. तर याच काळात 10,677 शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. 2015च्या आकडेवारीचा विचार करता, तेव्हा प्रत्येक एका व्यापाऱ्यामागे 1.44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. पण, 2020 मध्ये प्रत्येक एका शेतकऱ्यामागे 1.1 व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.