एस. के. गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशभरातील १४६ जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग दर १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही बाब चिंताजनक आहे. देशभरातील उपाचाराधीन रुग्णांची संख्या सध्या २१,५७,००० आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८५ टक्के आणि मृत्यूदर १.१७ टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले. १ मेपासून १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी गेल्या चोवीस तासांत २,९५,००० रुग्ण आढळले. देशभरात १३ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. गेल्या १४ तासांत ३० लाख डोस देण्यात आले, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्याच्या घोषणेसोबत सरकारने १२ तत्त्वे घोषित केली आहेत. इस्पितळांनी अधिक किंमत वसूल करू नये. प्रत्येकाने कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करावी.लस उत्पादक कंपन्यांना लसीची किंमत राज्य सरकार आणि खाजगी इस्पितळांच्या आधी घोषित करावी लागेल.लस उत्पादक कंपन्या ५० टक्के लसीचा पुरवठा केंद्र सरकारला, ५० टक्के राज्य सरकार आणि खाजगी इस्पितळ आणि लसीकरण केंद्रांना करतील. लस खुल्या बाजारात मिळणार नाही. केंद्र सरकार राज्यांच्या मागणीनुसार राज्यांना १५ दिवसांचा लसीचा साठा देईल. निश्चित दरापेक्षा अधिक पैसे घेतले जाऊ नयेत म्हणून निगराणी ठेवणार. यासाठी सरकारी अधिका-यांच्या नेमणूका केल्या जाणार आहेत.
१४६ जिल्ह्यांत कोरोना संसर्ग दर १५%पेक्षा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 4:59 AM