China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 11:41 AM2020-03-05T11:41:46+5:302020-03-05T11:57:10+5:30
China Coronavirus : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत
नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांतही कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 3,286 वर पोहोचली आहे तसेच 95,484 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरससाठी ही नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळेच या नवीन पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसच्या उपचाराच्या खर्चाचा देखील समावेश असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 29 झाली असून, परदेशात राहणाऱ्या 18 भारतीयांना लागण झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने जाहीर कार्यक्रम न घेण्याचा सल्ला दिला आहे.
China Coronavirus : 'राहूल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवालhttps://t.co/DQ5J59pMdQ#coronavirusindia#RahulGandhi#BJP
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटर अकाऊंटवर ट्विट केलं आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. परदेशात व भारतात लोक एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करतात. पण परदेशात लोक हस्तांदोलन टाळत आहेत. पण आता भारतीय संस्कृतीतील नमस्काराची पद्धत तिथे रूढ होत आहे. अनेक देशांतील लोकांनी मांसाहार बंद केला असून, ते शाकाहाराकडे वळत आहेत.
...तर 'अशा' कर्मचाऱ्यांना घरातून काम करु द्या; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची सूचना #coronavirushttps://t.co/TpBau9wvDK
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2020
कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी जगातील सर्व देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. 3 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. फेसबुक, ट्विटर आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सूचना केली आहे. कर्नाटक सरकारने कर्मचार्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्नाटक सरकारने बेंगळूरमधील सर्व कंपन्यांना सूचना केली आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली तर त्याला घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले जात आहे कर्नाटक सरकारने यासाठी परिपत्रक जारी केला आहे.
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा; इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले कारण... #CoronaAlerthttps://t.co/bVThY8VM9x
— Lokmat (@MiLOKMAT) March 5, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च
China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका
कोरोना विषाणू आता नोटिफाइड, आरोग्य विभागाची माहिती