Corona Symptoms: कोरोनाचे नवे लक्षण झोप उडविणारे; डॉक्टरांनाही काही सुचेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:17 AM2021-04-27T11:17:34+5:302021-04-27T11:17:54+5:30

New Corona Symptoms found in India: कोरोना व्हायरसची लक्षणे एवढी सामान्य आहेत की सर्दी-तापासारखीच भासतात. यामुळे अनेकजण सर्दी-तापावरची औषधे घेतात आणि नंतर कोरोना बळावला की जीव जाण्याचा धोका उत्पन्न होतो.

Corona Symptoms: Extreme fatigue with sudden drop in platelets in blood can be new Symptoms | Corona Symptoms: कोरोनाचे नवे लक्षण झोप उडविणारे; डॉक्टरांनाही काही सुचेना

Corona Symptoms: कोरोनाचे नवे लक्षण झोप उडविणारे; डॉक्टरांनाही काही सुचेना

Next

कोरोना व्हायरसची लक्षणे (Corona Symptoms) एवढी सामान्य आहेत की सर्दी-तापासारखीच भासतात. यामुळे अनेकजण सर्दी-तापावरची औषधे घेतात आणि नंतर कोरोना बळावला की जीव जाण्याचा धोका उत्पन्न होतो. आता एका नव्या अहवालाने सर्वांची झोप उडविली आहे. डॉक्टरांनाही काय करावे सुचेनासे झाले आहे. कोरोना झाल्याचे एक नवेच लक्षण समोर आले आहे. (Extreme fatigue with sudden drop in platelets in blood; a new symptom of corona virus in initial stage)

कोरोनाचे संक्रमण (Corona Virus) झाल्यावर अचानक रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत. तसेच त्याला खूप थकल्यासारखे वाटते. ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे नंतर जाणवू लागतात. या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घातक होऊ शकते. 
भारतातील एका रुग्णामध्ये ही लक्षणे दिसली आहेत. आझाद नगरचे अलीम शेख यांना १८ एप्रिलला खूप थकवा जाणवत होता. यामुळे त्यांची रक्त चाचणी करण्यात आली. त्यांच्या प्लेटलेट अचानक कमी झाल्या आणि 85,000 वर आल्या. सामान्य स्थितीत प्लेटलेट या दीड ते साडे चार लाख असतात. शेख यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधे घेण्यास सुरुवात केली परंतू २३ एप्रिलला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे पुन्हा त्यांच्या प्लेटलेट तपासण्यात आल्या. ते पाहून डॉक्टरही हादरले. शेख यांच्या प्लेटलेट २०००० झाल्या होत्या. 

CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली


यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटलची शोधाशोध सुरु केली. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. शेख यांचा मृत्यू झाला. ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. असाच काहीसा प्रकार बालागंजचे राजकुमार रस्तोही यांच्याबाबतीत झाला. त्यांना खूप थकवा जाणवू लागल्यावर त्यांचे रक्त तपासण्यात आले. यावेळी त्यांच्या शरीरात २१००० प्लेटलेट राहिल्याचे लक्षात आले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केल्यावर त्यांना कोरोना निमोनिया झाल्याचे निदान झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. 

CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता


राजकुमार यांना कोरोनाची सामान्य लक्षणे जाणवली नाहीत. सुका खोकला, ताप किंवा श्वास घेताना त्रास जाणवला नाही. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना १७ एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, २० एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले होते. या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरही नव्हता, असे त्याने सांगितले. 

Web Title: Corona Symptoms: Extreme fatigue with sudden drop in platelets in blood can be new Symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.