Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास?, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:15 AM2021-06-20T06:15:56+5:302021-06-20T06:35:43+5:30

रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ७५ ते ८० टक्क्यांनी घटते, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे.

Corona Vaccination: The chances of corona after vaccination are negligible | Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास?, जाणून घ्या!

Corona Vaccination: लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्यच; काय सांगतो अभ्यास?, जाणून घ्या!

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बहर आता ओसरत चालला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यातच लसीकरण मोहीमही आता वेग धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शुभवर्तमान असे आहे की, लसीकरण झाल्यानंतर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नगण्य असून रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ७५ ते ८० टक्क्यांनी घटते, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे.

काय सांगतो अभ्यास?

लसीकरणामुळे कोरोनानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण  ७५ ते ८०  टक्क्यांनी घटते. प्राणवायूची आ‌वश्यकता भासण्याचे प्रमाणही ८ टक्क्यांपर्यंत  कमी झाले आहे. अतिदक्षता विभागात दाखल करण्याची  शक्यताही ६ टक्क्यांपर्यंत  घटली आहे.

तिसऱ्या लाटेचं काय?

तिसरी लाट तूर्तास तरी दृष्टिपथात नाही. लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता कमी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका पोहोचण्याची शक्यता कमी आहे.

सद्य:स्थिती काय?

देशात ७ मे रोजी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येचा उच्चांक नोंदवला.१० मे रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या उच्चांकी होती.

पॉझिटिव्हिटी रेट : ५१३ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांहून कमी आहे.

रिकव्हरी रेट : ३ मेपासून रिकव्हरी रेट वाढीस लागला आहे. सद्य:स्थितीत रिकव्हरी रेट ९६ टक्के एवढा आहे. 

सिरो पॉझिटिव्हिटी रेट : १८ वर्षे वयावरील लोकांमध्ये ६७ टक्के. १८ वर्षे वयाखालील लोकांमध्ये ५९ टक्के

नागरी भाग
१८ वर्षे वयावरील
१८ वर्षे वयाखालील 

ग्रामीण भाग
१८ वर्षे वयावरील
१८ वर्षे वयाखालील

Web Title: Corona Vaccination: The chances of corona after vaccination are negligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.