Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:47 PM2021-05-17T20:47:36+5:302021-05-17T20:48:54+5:30
Corona Vaccination: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा थेट परिणाम भारतातील कोविशील्डवर दिसून येत आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आल्यानं लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आरोग्य कर्मचारी आणि लस घेणाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
...तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधान
कोविशील्डची लस घेतल्यानंतर २० दिवसांच्या आत रक्ताच्या गुठळ्या तर होत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. एखादं गंभीर लक्षणं जाणवल्यास तातडीनं लसीकरण केंद्रात जाण्याची सूचना करण्यात आली आहे. कोणतीही लस घेतल्यानंतर (विशेषत: कोविशील्ड) तीव्र स्वरुपाची डोकेदुखी, छातीत वेदना, शरीराला सूज, उलटीशिवाय पोटात वेदना, श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्यास तातडीनं लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.
१० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढा!, स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांची मागणी
इंजेक्शन घेतलेला भाग सोडता शरीराच्या इतर कोणत्याही भागावर लाल रंगाचे चट्टे येतात का, याकडे नागरिकांनी लक्ष ठेवावं. तुम्हाला मायग्रेनची समस्या नाही आणि उलटीसोबत किंवा उलटीसह सतत डोकं दुखत असल्यास लसीकरण केंद्रावर जाऊन त्याची माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. लस घेतल्यानंतर जास्त अशक्तपणा जाणवत असल्यास, शरीराच्या एखाद्या अवयवानं काम करणं बंद केल्यास, कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होत असल्यास, डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्यास, ताण-तणाव येत असल्यास लसीकरण केंद्रावर जावं आणि त्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांना द्यावीत, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.